पंढरपूर – यशवंतराव चव्हाणांनी कोणत्याही एका विचारधारेचा आपल्या
व्यक्तीमत्वावर परिणाम होवू न देता राष्ट्रवाद, साम्यवाद, गांधीवाद, मार्क्सवाद व
समाजवाद या सर्वांचा अभ्यास करुन समाजाला महत्वाचा वाटणारा मध्यममार्ग त्यांनी
स्वीकारला. शाळेत आणि समाजात असणारे विचारांचे द्वंद्व समजून घेऊन निधर्मी
राष्ट्रवादाची त्यांनी जोपासना केली. म्हणूनच यशवंतराव हे टिळक, गोखले, रानडे व
डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर राष्ट्रीय नेते ठरतात.” असे प्रतिपादन थोर इतिहास
अभ्यासक प्रोफेसर डॉ. अरुण भोसले यांनी केले.
______________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ‘प्राध्यापक प्रबोधिनी’ उदघाटन समारंभात ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे हे होते. डॉ. अरुण भोसले पुढे म्हणाले की, “यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ गतीमान केली. बहुजन समाजाच्या विकासासाठी शिक्षण आणि तंत्रशिक्षणाला प्राधान्य दिले. सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी ईबीसी सवलतीची सुरुवात केली. महाराष्ट्राच्या विकासासाठी साहित्य आणि संस्कृती मंडळाची निर्मिती केली. महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांना एकत्र बांधण्यासाठी बहुजनवाद स्वीकारला. कृषी विकास साधण्यासाठी सहाकार पुनर्रचना करुन सहकार संस्थांचे जाळे निर्माण केले. पंचायत राज्य पध्दतीचा स्विकार करुन सामान्य घटकांना प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यामुळेच ग्रामीण भागातून नवे नेतृत्व निर्माण होवू शकले.”
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाणांचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच त्यांना ‘जाणता राजा’ असे म्हणतात. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णअक्षरांनी नोंदले गेले आहे. यशवतरावांनी विकासाच्या रथाचे तोंड गरिबाच्या झोपडीकडे फिरविण्याचे काम केले. यशवंतरावांच्या नंतर एवढ्या उंचीचा नेता महाराष्ट्रात अद्याप झाला नाही.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. एस. पी. शिंदे यांनी करुन दिला. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एन. एन. तंटक, उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, उपप्र चार्य ए. एस.चंदनशिवे आदी मान्यवर व सिनिअर, ज्युनिअर व व्यवसाय अभ्यासक्रमातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. के.पी. गायकवाड यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. आर. जी. कवडे यांनी मानले
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________




0 Comments