पंढरपूर दि.01- पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवड महत्वाची असून, पर्यावरणाचे जतन व संरक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घेऊन प्रत्येक नागरीकाने वृक्ष लागवड करावी असे, आवाहन गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी केले.
33 कोटी वृक्षलागवड मोहिमेतंर्गत पंचायत समिती कार्यालय पंढरपूर येथे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य श्री.मोटे, तालुका कृषी अधिकारी श्री.पवार यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रदुषणामुळे तापमानात वाढ झाली असून, वाढत्या तापमानामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाचा समतोल राखयचा असेल प्रत्येक नागरीकांनी वृक्ष मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन कार्यालयाच्या सभोवताली, परिसरात, अंगणात, शेतावरील बांधावर वृक्ष लागवड करावी असे गटविकास अधिकारी घोडके यांनी सांगितले. वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या सर्व विभागा बरोबरच ग्रामपंचायतस्तरावर नियोजन केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले




0 Comments