अंध विकास संस्थेमध्ये धान्य व गणवेश देणेसंबंधी मंदिर समितीकडे मागणी... महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेकडून निवेदन


पंढरपूर (प्रतिनिधी):- श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून येथील अंध विकास संस्थेतील विद्यरार्थ्यांसाठी धान्य व गणवेश मिळावे याबाबतच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेकडून मंदिर समितीला देण्यात आले. तेली समाज महासभेचे शहराध्यक्ष मधुकर ज्ञानेश्‍वर फलटणकर यांनी नुकतेच या मागणीसंबंधीचे निवेदन मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना दिले. यावेळी कार्याध्यक्ष सागर पडगळ, उपाध्यक्ष बालाजी देशमाने आण्णा सलगर आदी उपस्थित होते.


पंढरपूर येथील शहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळेत निवासी 55 मुले व मुली आहेत. सदर अंध विद्यार्थ्यांना मंदिर समिती मार्फत प्रति महिना 200 किलो गहु, 150 किलो तांदुळ व प्रतिवर्षातुन दोन वेळा गणवेश पुरविण्यात यावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. मंदिर समितीच्या मिटींगमध्ये आपली मागणी समितीचे अध्यक्ष व सदस्यांसमोर ठेवुन याबाबतचा सकारात्मक विचार करु असे आश्‍वासन मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिले असल्याची माहिती मधुकर फलटणकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.







-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments