___________________________________________
तलाठ्यांनी सर्व प्रकरणांचा तात्काळ निपटारा करुन महसूल विभागाची प्रतिमा उंचवावी
--जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि.30:- महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून जमीनीशी संबंधित सर्व प्रकारच्या कामासाठी जनतेचा नेहमी या विभागाशी सबंध येतो. त्यामुळे तलाठ्यांनी सर्व प्रकरणांचा तात्काळ निपटारा करुन महसूल विभागाची प्रतिमा उंचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले. ई-फेरफार प्रणाली बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली, यावेळी राम बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, राज्य समन्वयक रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आदी उपस्थित होते.
.
_________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
राम म्हणाले, पुणे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी योग्य नियोजन करुन त्यानुसार सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे. तहसीलदार यांनी वेळोवेळी बैठका घेवून झालेल्या व उर्वरित कामाचा आढावा घ्यावा. या कामामध्ये तलाठी हा महत्वाचा घटक असल्यामुळे त्यांनी या कामाला प्राधान्य द्यावे, डीजीटल स्वाक्षरीच्या सातबारांमधील विसंगती दुर करण्यावर भर द्यावा. तसेच प्रलंबित प्रकरणे गतीने मार्गी लावून महसूल विभागातील विविध विषयांशी संबंधित कामकाजही वेळेत पूर्ण करावे. सातबारा संगणकीकरण प्रक्रियेत राज्यात पुणे जिल्ह्याचे काम सर्वोत्कृष्ट होण्यासाठी सर्वांनी कार्यक्षमतेला इच्छाशक्तीची जोड देणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
रामदास जगताप यांनी ई-फेरफार, डीजीटल स्वाक्षरी सातबारा मासिक अहवाल, विविध प्रकारचे अहवाल, कलम 155 च्या आदेशांतर्गत दुरुस्त्या, ई पिक पाहणी, ई हक्क, ई-फेरफार प्रणालीमध्ये महसूल अधिकाऱ्यांची भूमिका या विषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. विभाग समन्वयक शामल काकडे यांनी कलम 155 च्या आदेशाने करण्यात येणाऱ्या फेरफारबाबत सादरीकरण केले. यावेळी विजयसिंह देशमुख यांनी सातबारा संगणकीकरणाबाबत माहिती दिली. कार्यशाळेस बारामती-इंदापूर व दौंड- पुरंदर या विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळअधिकारी व तलाठी उपस्थित होते
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________





0 Comments