शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रह्मवृंद संस्था श्री क्षेत्र पंढरपूर व श्री तिरुमला तिरुपती देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने चतुर्वेद संयुक्त वेद पारायण संपन्न झाले या चतुर्वेद संयुक्त वेद पारायण मध्ये भारतातील एकूण 60 घनपाठी यांनी श्री विठ्ठल मंदिरामध्ये व शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रह्मवृंद संस्था संचालित महर्षी याज्ञवल्क्य वेद पाठशाळा मध्ये दुपारी घनपारायण करून पर्जन्यवृष्टी व विश्वकल्याणासाठी या वेळेस पुरुषास मंत्रोच्चाराच्या साह्याने साकडे घातले. या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली .
यावेळेस शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रह्मवृंद संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच श्री तिरुमला तिरुपती देवस्थानचे घनपाठी राघव घनपाठी व भारतामधून उपस्थित असलेले घनपाठी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमास सुरुवात झाली .याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रह्मवृंद संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती विद्याधर वांगीकर यांनी या वेद पारायण याचा उद्देश कथन करीत संस्थेचा इतिहास सांगत असताना घनपाठी पंडित प्राण भगवान शास्त्री धारूरकर, वैदिक केंद्र कृष्णंभट घनपाठी ,घनपाठी रामचंद्र वांगीकर ,शंकर भट इंदापूरकर या मान्यवरांचा उल्लेख करीत वेद पारायण यामागील ऋषीमुनींची संकल्पना स्पष्ट केली.
या कार्यक्रमाची सांगता करताना चारही शाखेचे घनपाठी यांचे शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच श्रीतिरुमला तिरुपती देवस्थानचे राघव घनपाठी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रह्मवृंद संस्थेचे सर्व सदस्य व इतर मान्यवर ही उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उन्मेश आटपाडीकर यांनी संस्कृत मधून केले व आभार श्री हरिभाऊ जोशी यांनीकेले






0 Comments