उत्तर सोलापूर प्रतिनिधी/अजयकुमार खांडेकर:- पत्रकार सुरक्षा समितीची सोलापुरात बैठक घेण्यात आली सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे होते सदर बैठकीत
पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील सर्वच माध्यमाच्या पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी राज्यातील सर्वच जेष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू करावी पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची स्वतंत्र चौकशी यासह पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकर पत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू करावा अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे यांनी या बैठकीत केली.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, गोविंद शेंडगे, वैजीनाथ बिराजदार, विकास आमटेकर, अजय खांडेकर, इम्तियाज तांबोळी, अरूण सिडगिद्दी,दामोदर पासकंटी, राजेंद्र पवार, विशाल सपकाळ, संतोष गायकवाड, सॊमनाथ मुंजे, विष्णू सुरवसे, विनोद चव्हाण, प्रदीप चव्हाण, इत्यादि पत्रकार उपस्थित होते.





0 Comments