राजश्री शाहु महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन पंढरपूर येथे मराठा सेवा संघ प्रणित डॉ. पंजाबराज राष्ट्रीय शिक्षक परिषद यांच्या वतीने इयत्ता 10 वी व 12 वी तसेच राष्ट्रीय शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन करण्यात आले. यावेळी निवृत्त पोलिस निरीक्षक शहाजी जाधव, किरण घाडगे, रणजित जगताप, सचिन जगताप, समाधान घाडगे, मोहन रोंगे, साहेबराव भुसे आदी उपस्थित होते.
या चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले याचा आनंद असल्याचे मत पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्याच्या भारत देशाचे उज्जवल भवितव्य या गुणवंत विद्यार्थ्यांच्या हातात आहे. अशा गुणवंतांची देशाला गरज आहे. सामाजिक स्थैर्य लाभण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. चांगले शिक्षण, ज्ञान घेऊन विविध क्षेत्रात चौफेर कामगिरी करणार्या अशा गुणवंतांची सर्वच क्षेत्रात गरज आहे. या गुणवंतांचा सत्कार मला करण्याचं भाग्य लाभलं याचा विशेष आनंद झाला. असे मत पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुणवान विद्यार्थ्यांचा सन्मान शिक्षक संघटनेकडून केला जातोय. याद्वारे गुणवंतांच्या गुणांना वाव देण्याचे कार्य केलं जातंय. या माध्यमातुन 200 विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षक-समाज-पालक-विद्यार्थी हा ॠणानुबंध संघटनेने जोपासला असल्याचे मत शिक्षक भारत पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह.ना. भोसले, डी.डी. जाधव, मकरंद रणदिवे, प्रकाश जाधव, नितीन पाटील, मोहन गायकवाड, रा.भा. भालेराव, विष्णुपंत गावडे, किशोर मोळक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हनुमंत भोसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार भारत पाटील सर यांनी मानले.







0 Comments