स्वेरीच्या पाच विद्यार्थ्यांची आर.बी. इलेक्ट्रोनिक्स कंपनीत निवड


पंढरपूरः-आर.बी. इलेक्ट्रोनिक्स’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
         इलेक्ट्रोनिक्स क्षेत्राशी संबंधीत पुणे येथील आर.बी. इलेक्ट्रोनिक्स या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट सुधाकर पोळ व आनंद जाधव यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनीअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगचे  सायली गाडेकर, शितल साळुंखे, कुतुबुद्दीन कुमठे व सिद्धार्थ उपासे या पाच विद्यार्थ्यांची आर.बी कंपनीत निवड करण्यात आली आहे. 


श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये दररोज नवनवीन व आंतरराष्ट्रीय कंपन्या येतात आणि कंपनीसाठी पात्र असे विद्यार्थ्यांची निवड करतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात. याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थीनींना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळप्रा. डी.ए. कुंभार व प्रा.एस.व्ही.दर्शने आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तस्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्यउपप्राचार्यविभागप्रमुखइतर अधिष्ठाताप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.  



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments