पंढरपुर (प्रतिनिधी) आजच्या डिजिटल जगात, स्पर्धेच्या युगात विद्यार्थी विविध उपकरणाच्या वापरात अडकले आहेत. घरातील संवाद कमी झालाय. अशा वेळी शिक्षक विद्यार्थी अंतर क्रिया व संवाद घडवून विद्यार्थ्याना ध्येयाकडे प्रेरित करणारे शिक्षक व शिक्षण व्यवस्था कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाने जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊन सिद्ध केले आहे. पुणे येथील ‘पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीस्’ कंपनीने जागतिक दर्जाचे अभियांत्रिकी उपकरणे निर्माण करून पुरवठा आणि निर्यात करण्याच्या क्षेत्रात एक नक्षी निर्माण केली आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिक महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्याची प्लेसमेंट द्वारे निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेले मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील आदित्य अभंगराव, पूनम भोसले, प्रणव जाधव, मनाली मांगले, मनोज जठार, पांडुरंग कोरके तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील ओंमकार उदगे, किशोर दगडे आदी विद्यार्थ्यांची पुणे येथील पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीज पुणे कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.
या निवडीमुळे पालक वर्गातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सोलापूर जिल्हातून अभिनंदन होत आहे. ‘पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीस्’ कंपनीत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा. भारत आदमिले आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.





0 Comments