पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील दोन ठिकाणी घरफोडया चा गुन्हा घडला असुन चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे. दोन घरफोड्यांमध्ये दीड तोळे सोने व मंदिराची दानपेटी फोडून 3 ते 4 हजार रूपयांची चोरी झाली आहे.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व कांही धागेदोरे मिळाले आहेत. व चोरट्यांच्या तपासासाठी 2 पोलीस पथके रवाना केली असुन पोलीस चोरट्यांच्या मागावर आहेत. हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालु आहे. अशी माहिती पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पंढरपूर लाईव्हला दिली आहे.





0 Comments