डाकघर विभागाच्या आधुनिक सुविधांचा लाभ घ्यावा - उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे


 पंढरपूर दि.01   सर्वसामान्य जनतेपर्यंत डाकघर विभागाने विविध  सेवा-सुविधा पुरविण्याचे काम केले  आहे.  डिजिटल इंडीया अंतर्गत डाक विभागाने सर्वसामान्य नागरीकांसाठी विविध आधुनिक सुविधा सुरु केल्या असून, या सुविधांचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे, आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी केले.
 पंढरपूर डाकघर विभागाच्या वतीने ‘डिजिटल इंडीया’ च्या  वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर  डाकघर येथे आधार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पंढरपूर डाकघर अधिक्षक एन.रमेश, सहाय्यक अधिक्षक आर.बी.घायाळ  उपस्थित होते. 

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कवडे म्हणाले,  देशात  शहरी तसेच ग्रामीण भागात डाकघर विभागाचे जाळे सर्वदूर पसरले असून, पोस्ट खाते हे सर्वात मोठी बँक आहे.डाकघर विभागाने अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत विविध योजना पोहचविल्या आहेत. या योजनामुळे ग्रामीण भागतील सर्वसामान्य जनतेला   निश्चित लाभ होईल असेही उपविभागीय अधिकारी डॉ.कवडे  यांनी सांगितले.



 डाकघर विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवेचा  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी व नागरीकांनी लाभ घ्यावा असे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले.  यावेळी डाकघर अधिक्षक एन.रमेश यांनी डाकघर विभागामार्फत सुरु असलेल्या माझे तिकीट (My Stamp), इंडीया पोस्ट  पेमेंट्स बँक ( IPPB), सुकन्या समृध्दी योजना, टपाल विमा योजना व  इतर योजनांची माहिती दिली. तसेच मंगळवेढा, सांगोला,  माढा या ठिकाणीही आधार शिबीर आयोजित करण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी पोस्ट फोरमचे सदस्य डॉ. फडे, श्री.हरिदास तसेच डाकघर विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह नागरीक उपस्थित होते.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments