राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार्या नेत्यांना पॉवरफुल्ल दणका देण्यासाठी शरद पवारांची नवी रणनिती राष्ट्रवादी ला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे अनेक नेते गेल्या अनेक दिवसांपासुन भाजपाकडे जात आहेत. राष्ट्रवादीला सोडुन जाणार्या या नेत्यांना पॉवरफुल्ल दणका देण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका नव्या रणनीती आखण्यास प्रारंभ केला असुन त्यादृष्टीने राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
नेत्यांच्या आऊटगोईंगची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपचाच शैली अवलंबणार आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे. तसंच मतदारसंघात तरूण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी विशेष मेहनत घेणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी सोडणाऱ्या या नेत्यांवर पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षात बदल करताना नेहमी भाकरी फिरवणे या शब्दाचा वापर करत असतात. आता शरद पवार यांचे नातू रोहित यांनीही पवारांच्याच शैलीत नेत्यांवर निशाणा साधला आहे. 'एखाद्या व्यक्तीच्या सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं,' अशा शब्दांत रोहित पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना टोला लगावला आहे.






0 Comments