महाराष्ट्र राज्य सवाते असोसिएशन राज्य संघटना अध्यक्ष पदी श्याम राक्षे यांची निवड


आटपाडी (प्रतिनिधी ) :- फेडरेशन इंटरनॅशनल-डे सवाते या जागतिक सवाते व एशियन सवाते कॉन्फेडेरेशन संघटनेशी सलग्नता असलेली सवाते असोसिएशन- इंडिया (साई) या राष्ट्रीय संघटनेची साधुपूल, हिमाचल प्रदेश येथे  वार्षिक सर्वसाधारण पार पडली या सभेत एकमताने महाराष्ट्र राज्य सवाते असोसिएशन राज्य संघटना अध्यक्ष पदाची श्याम विष्णू राक्षे ( आटपाडी )यांची निवड करण्यात आली व तसेच ऑल मराठी सवाते असोसिएशन या संघटनेला राज्य संघटना म्हणून संलग्नता प्रमाणपत्र साईचे सचिव एन.बी. पवार यांनी प्रदान केले.श्याम राक्षे स्वत: मार्शल आर्ट तायक्वांदो खेळाचे राष्ट्रीय  खेळाडू व पंच असून गेली २५ वर्षापासून श्याम राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडले आहेत.
                

सवाते खेळा बद्दल नवनिर्वाचीत राज्य संघटनेचे अध्यक्ष श्याम राक्षे माहिती देताना सांगितले कि, सवाते हा क्रीडा प्रकार फ्रेंच किक बॉक्सिंग मार्शल आर्ट प्रकार आहे. 1924 साली पॅरीसमध्ये झालेल्या ऑलिंपिक खेळांमध्ये एक प्रात्यक्षिक खेळ म्हणून याचा समावेश करण्यात आला. 2008 साली, इंटरनॅशनल युनिर्व्हव्हर्स स्पोर्ट्स फेडरेशनने मान्यता यास दिली होती - या मान्यतामुळे अधिकृत विश्व विद्यापीठ , विश्व अजिंक्यपद झाले होते. पॅरीस  ओलम्पिक 2024 मध्ये कायम क्रीडा प्रकारात समावेश होण्यासाठी फेडरेशन इंटरनॅशनल-डे सवाते प्रयत्नशील आहे.
               भारतासारख्या देशात 2016 पर्यत हा खेळ जास्त प्रचलित नव्हता. सुखविंदर सिंग व नवज्योत पवार यांच्या प्रयत्नाने भारतामध्ये भारतीय ऑलम्पिक संघाचे उपाध्यक्ष करणसिंग चौटाला यांच्या अधिपत्या व मार्गदर्शनाखाली सवाते असोसिएशन- इंडिया (साई) या राष्ट्रीय संघटनेची स्थापना करून भारतात सवाते खेळाचा कमी कालावधीत प्रचार व प्रसार केला.तसेच श्याम राक्षे यांनी सन २०१८ पासून महाराष्ट्र राज्यातून राज्य संघाचे नेतुत्व करीत आहेत.
तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हासाठी सलग्नता खुली करण्यात आली आहे तरी इच्छूक प्रशिकांनी 9423037699 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन राज्य अध्यक्ष श्याम राक्षे यांनी केले आहे.


ऑल इंडिया सवाते स्पर्धा २०१९, साधुपूल हिमाचल प्रदेश येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने १० सुवर्ण पदक घेत द्वितीय सांघिक चषक पटकावले. विजेत्या खेळाडूंची नावे
१. अमेय नाकील
२. हर्षवर्धन सागर
३. कुशाल लोहार
४.विश्वजित ऐवळे
५. सुदर्शन बालटे
६. प्रथमेश भिंगे
७.स्वप्नील देशमुख
८. ऋतुराज ऐवळे
९. कु. ऋतिका कांबळे
१०.सागर लाड
खेळाडूना मार्गदर्शन मुख्यप्रशिक्षक गणेश राक्षे यांचे लाभले.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments