स्वेरीत बी.ए.आर.सी. चे डॉ. नरेंद्र दत्त शर्मा यांचे संशोधनासाठी मार्गदर्शन संपन्न


 पंढरपूर-  स्वेरीतील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्र,(बी.ए.आर.सी.) मुंबईतील जेष्ठ शास्त्रज्ञ व माजी नियंत्रक डॉ. नरेंद्र दत्त शर्मा यानी संशोधन क्षेत्रातील सखोल माहिती देवून अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी वाट मोकळी करून दिली.

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संशोधन मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबईतील जेष्ठ शास्त्रज्ञ व माजी नियंत्रक डॉ. नरेंद्र दत्त शर्मा मार्गदर्शन करत होते. शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी प्रास्तविकात जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शर्मा यांची ओळख करून दिली. संशोधन क्षेत्रात स्वेरीने  अल्पावधीत केलेली प्रगती सविस्तर पणे सांगून त्यासाठी  केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून मिळालेला निधी याची देखील सविस्तर माहिती दिली. 


यावेळी मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञ डॉ. शर्मा म्हणाले की, ‘थोर शास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी स्वातंत्र्योत्तर काळात घालून दिलेला संशोधनाचा पाया या पिढीच्या संशोधनाच्या माध्यमातून मजबूत होत असून आपला सहभाग देखील संशोधनाला गती प्राप्त करून देत आहे ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.’ असे सांगून संशोधनाविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन करत होमी भाभा यांच्या कार्याची ओळख करून दिली.  यानंतर डॉ. शर्मा यांनी सपत्नीक संशोधन विभाग, आर,एच. आर.डी. एफ, वर्कशॉप, असे विविध विभागांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. स्वेरीने घेतलेली झेप पाहून ते भारावून गेले. यावेळी सौ. शर्मा, स्वेरीचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संदिपराज साळुंखे यांनी केले तर आभार प्रा. सचिन गवळी यांनी मानले.  

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments