पंढरपुर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन पुणे येथील ‘शारदा ईक्ट्रीकल्स’ कंपनीत ४ विद्यार्थ्याची कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांची कमालीची शिस्त व उत्कृष्ट पद्धतीचे नियोजन, विद्यार्थ्यांचे वैयक्तिक कौशल्य व शैक्षणिक गुणवत्ता पाहून विद्यार्थ्यांची पुणे येथील शारदा ईक्ट्रीकल्स कंपनीने महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील सागर पोहरे, संजय कोळी, सुरज पोहरे आणि अभिजित देशमुख या ४ विद्यार्थ्याची विद्यार्थ्याची पंढरपूर सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात आली आहे.
अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील सर्वाधिक विद्यार्थी निवडण्यासाठी अनेक कंपन्या पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात येत आहेत. प्रत्येक वर्षी प्लेसमेंटची टक्केवारी वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन कंपनीत काम करण्याची संधी प्राप्त होत आहे. औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून विकास झाल्यामुळे तसेच महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्र विभाग असल्यामुळे अशा पद्धतीची प्रगती विद्यार्थी करू शकले. महाविद्यालयामध्ये सेन्ट्रल ट्रेनिंग प्लेसमेंट पुणे येथे असुन महाविद्यालयामध्ये देखिल विविध कंपन्या भेटी देतात व त्यातुनच पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया होत असते.
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहावे यासाठी पंढरपुर सिंहगड महाविद्यालय नेहमीच पुढाकार घेत असुन विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास निर्माण होण्यासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय जगातील नामवंत कंपनीत येथील विद्यार्थी आज नोकरी मिळवत असल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातुन आनंदी वातावरण निर्माण झाले असुन यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वञ अभिनंदन व कौतुक होत आहे.
‘शारदा ईक्ट्रीकल्स’ कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, डॉ.अल्ताफ मुलाणी, प्रा. अनिल निकम, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा. अमित भादुले, प्रा. भारत आदमिले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.





0 Comments