पंढरपूर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर इन्स्टिट्यूट मधील कर्मचा- यांनी विठ्ठल नवले यांना श्रद्धांजली वाहिली.
एखतपुर (ता. सांगोला) येथील माजी सरपंच व सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विठ्ठल (आण्णा) नवले यांचे मंगळवारी सकाळी ६ वाजता पुणे येथे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. एखतपुर येथे मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंंस्कार करण्यात आले.
सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष एम. एन. नवले सर यांचे ते मोठे बंधुचे होते. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे विठ्ठल नवले हे संचालक होते. निधन झाल्याची वार्ता समजताच नातेवाईक व शैक्षणिक संस्थेतील कर्मचा-यामधुन हळहळ व्यक्त होत असुन विठ्ठल नवले यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.






0 Comments