पंढरपूर (प्रतिनिधी) अरिहंतम इंफ्रास्ट्रक्ज प्रायव्हेट लिमिटेड हि कंपनी पूल, बांधकाम, पुल, देखभाल, पुलाचे बांधकाम, बंदरांचे बांधकाम, पाईपलाइन बांधकाम, रेल्वे बांधणे, रस्ते बांधणे, रस्सी बांधणे, इत्यादी कामे करीत असून या कंपनीत पंढरपूर सिंहगड मधील ७ विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील योगेश मडके, अरबाज मुलाणी, निलेश नवले, जीशान शेख, अक्षय शिंदे, नित्यानंद पिस्के आणि पृथ्वीराज चव्हाण आदी ७ विद्यार्थ्यांची पंढरपूर सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्याना ध्येयाकडे प्रेरित करणारे शिक्षक व शिक्षण व्यवस्था सिंहगड मध्ये असून अल्पावधीतच सातत्यपूर्ण, उत्कृष्ट शैक्षणिक निकाल व प्लेसमेंटमध्ये अग्रेसर असणारे पंढरपूर सिंहगड महाविद्यालय आहे. मुलाखती घेऊन सर्व गुणांनी कंपनीच्या कामासाठी उपयुक्त असे स्कील, गुण विचारत घेऊन विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. या निवडीमुळे पालकांमध्ये व विद्यार्थ्यामध्ये उत्साही व आनंदी वातावरण निर्माण झाले असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वञ अभिनंदन व कौतुक होत
अरिहंतम इंफ्रास्ट्रक्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, डॉ.अल्ताफ मुलाणी, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. सुर्यकांत पाटील आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.





0 Comments