पंढरपूर- फार्मसीच्या उच्च शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक असणारी नायपर (नॅशनल इन्स्टिटयूट फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च) ही परीक्षा संपूर्ण भारतात होत असते याच पार्श्वभूमीवर स्वेरी फार्मसीच्या कुशल विठ्ठल वांगदळे या विद्यार्थ्यांने दैदिप्यमान यश मिळवले. यापूर्वी सन २००९-१० वेळी संतोष गेजगे याने या परीक्षेत यश मिळविले होते.
स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीची स्थापना २००६ साली झाली तेथून प्रत्येक वर्षी अभियांत्रिकी प्रमाणेच फार्मसीने देखील नवीन विक्रम नोंद करू लागले. यावेळी एम.एस., एम.फार्मसी., एम.टेक इन फार्मसी अशा फार्मसीच्या उच्च शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक असणारी ‘नायपर’ परीक्षेत कुशल वांगदळे यांनी ऑल इंडीयामध्ये ५०४ वा रँक मिळविला आहे. ट्रेनिंग व प्लेसमेंटचे प्रमुख डॉ. संजीवकुमार तसेच प्रा आर.एस. नाईकनवरे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल, प्रा. एम्.जी. मनियार, प्रा. प्रज्ञा साळुंखे, प्रा. स्नेहल चाकोरकर, इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विध्यार्थी व पालकांनी कुशल वांगदळे यांचे अभिनंदन केले.





0 Comments