पंढरपूरः-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी (पदव्युत्तर पदवी) प्रवेश प्रकियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६२२०) ची प्रक्रिया रविवार, दि.७ जुलैपासून सुरु झाली असून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तसेच अचूक फॉर्म भरण्यासाठी एफ.सी. केंद्रावर विद्यार्थी आणि पालक गर्दी करत आहेत. या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जुलै २०१९ सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालणार असून याची खात्री करण्याची शेवटची तारीख १२ जुलै अशी आहे. तर एम.ई. / एम.टेक. ची अंतिम गुणवत्ता यादी दि. १७ जुलै रोजी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर कॅप राउंड सुरु होतील.’ अशी माहीती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
एम.ई. (अभियांत्रिकी-पदव्युत्तर पदवी) सन २०१९-२० प्रवेशाकरीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज कायम करणे आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने अधिकृत केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी एम.ई. / एम.टेक. प्रवेश प्रकियेचे मार्गदर्शन, संबधीत कागदपत्रे जमवाजमव करताना होणारी अडचण व आदी शंकाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हे केंद्र सुरु केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी एफ.सी.क्र.६२२० या केंद्रावर गर्दी केल्याचे दिसत आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यामधील विद्यार्थीं देखील येथे येवून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत आहेत. या रजिस्ट्रेशन प्रकियेची अंतिम मुदत गुरुवार दि.११ जुलै २०१९ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत पर्यंत आहे. त्यानंतर संबंधित प्रमाणपत्रे व कागदपत्रे दुरुस्ती प्रक्रिया दि. १६ जुलै २०१९ पर्यंत चालणार असून अंतिम यादी १७ जुलै रोजी अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध होईल. यासाठी अभियांत्रिकीची पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि गेट परीक्षेमध्ये नॉन झिरो पॉझिटीव्ह गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना एम.ई./ एम.टेक. प्रवेशाचा लाभ घेता येणार आहे. एम.ई./ एम.टेक.च्या प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी समन्वयक प्रा.श्रीकृष्ण भोसले (मोबा.क्र.-९५४५५५३८१४), प्रवेश अधिष्ठाता डॉ.पी.एस.कचरे(मोबा.क्र.- ९५४५५५३७७४), स्वेरी कॅम्पस इंचार्ज प्रा. एम.एम.पवार (मोबा.क्र.-९५४५५५३८८८) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पदवी अभियांत्रिकीच्या. ऑलाईन प्रवेशासाठी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवरच एम.ई./ एम.टेक. प्रवेश प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.





0 Comments