इस्कॉनचे जनक श्रील प्रभुपाद यांचे वरीष्ठ शिष्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या पुढाकाराने चंद्रभागा नदीच्या पुर्व किनार्यावर इस्कॉन पंढरपूर मंदिराने 8 वर्ष परीश्रम घेऊन श्रील प्रभुपाद यांच्या नावाने 3 एकर जागेत प्रचंड मोठा घाट बांधला आहे. या घाटाचे उद्घाटन येत्या 11 जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.तब्बल 15 कोटी रुपये खर्चुन इस्कॉनने सर्व सोयींनीयुक्त उभारलेल्या या घाटाचा भाविकांनी लाभ घ्यावा अशी विनंती इस्कॉन प्रेस सेवा समिती चे डॉ. शामसुंदर शर्मा यांनी केली आहे.





0 Comments