वार्ताहर (पंढरपूर) : डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या नुकत्याच पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये पंढरपूर रोटरी क्लबच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव करण्यात आला असे अध्यक्ष जयंत हरिदास यांनी सांगितले.
पंढरपूर परिसरातील २८ शाळांमधील आदर्श शिक्षक यांच्या निवडीबद्दल रोटरी क्लब पंढरपूरला सुप्रीम स्टार क्लब हे मानांकन प्राप्त झाले. पोलिओ निर्मूलनाच्या कार्यासाठी रोख रक्कम देऊन द्वितीय क्रमांकाने व सामाजिक गरज लक्षात घेऊन मुलींसाठी शाळांमधून सॅनेटरी पॅड वेंडिंग मशीन वाटप केल्याबद्दल तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. आदिप्रभा या महिला कॉन्फरन्ससाठी पंढरपुरातील जास्तीत जास्त महिला उपस्थित झाल्याबद्दल द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
रोटरी इंटरनॅशनल कडून क्लबला गोल्ड सायटेशन अवार्ड प्राप्त झाले आहे. वरील सर्व यश पंढरपूरकरांच्या सहकार्यानेच प्राप्त झाले आहे त्याबद्दल रोटरी क्लब पंढरपूर सर्वांचे ऋणी राहील.
प्रांतपाल विष्णुजी मोऺढे यांनी सोलापूर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी सचिव किशोरभाई सोमाणी डॉ.दीपक अचलारे,श्रीकांत देशपांडे सौ.अनुराधा हरिदास आदि उपस्थित होते.






0 Comments