पंढरपूर दि.04 ः सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी विधीमंडळात औचित्याच्या मुद्दयाद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथील 65 एकराच्या परिसरास श्री भक्त पुंडलिक नगरी असे नामःकरण करण्यात यावे आणि याबाबतची पुढील कार्यवाही शासनाने तातडीने करावी अशी विनंती सभागृहात केली.
श्रीक्षेत्र पंढरपूर ही भारताची दक्षिण काशी म्हणूनच ओळखली जाते. श्रीक्षेत्र पंढरपूर शहरांमध्ये देश-विदेशातील व राज्यातून ठिक-ठिकाणाहून आलेल्या भाविक भक्तांना व दिंड्यांना अडचणी येऊ नये व त्यांना सोई-सुविधा मिळण्याकरिता पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पैलतीरी असणार्या 65 एकर परिसरामध्ये शासनाने सर्व भाविक भक्तांसाठी व आलेल्या यात्रेकरूंची योग्य ती सोय व्हावी सोई-सुविधा एकत्रित ठिकाणी मिळावे म्हणून सदर 65 एकर परिसराचा विकास करण्याचे निश्चित केले असून त्याबाबतची कार्यवाही व नियोजन करण्यात येत आहे.
तसेच या पंढरी नगरीची ओळख विठ्ठल भक्त पुंडलिक महाराज यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन साक्षात ईश्वराने या पावन पंढरी नगरीमध्ये कायम वास्तव्य केले. अशा या महान पंढरी नगरीमध्यें युगेन-युगे विठ्ठल विटेवरी उभे का? असा प्रश्न अनेक तरूण, वारकरी व भाविक भक्तांमध्ये पडतो. त्यामुळे त्यांची महती तपासून घेतली असता, आपल्या आई-वडिलांची सेवा करणारा भक्त पुंडलिक आणि अशा भक्त पुंडलिकांनी ज्या वेळेला विठ्ठलाने पुंडलिका भेटीसाठी विचारले, विनवणी केली असता भक्त पुंडलिक म्हणाले की, मला माझ्या आई-वडिलांची सेवा करावयाची असल्याने त्यांनी आई-वडिलांच्या सेवेसाठी मग्न असल्यामुळे युगेनयुगे विठ्ठल विटेवर उभा राहिला. त्यामुळे या भक्त पुंडलिकाचे एवढे महत्व असतांना त्यांचे नांव या पंढरपूर शहरातील 65 एकराच्या परिसरास देऊन श्री भक्त पुंडलिक नगरी असे नामःकरण करण्यात यावे. याबाबत पुढील कार्यवाही शासनाने तातडीने करावी अशी विनंती आमदार श्री भारत भालके यांनी यावेळी सभागृहात केली.





0 Comments