पंढरपुर (प्रतिनिधी) सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील विविध विभागातील ३३ विद्यार्थ्यांची जस्ट डाईल या कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील हेमंत रणदिवे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील धनश्री म्हेत्रे, अब्दुलसमद सय्यद, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील प्रियांका कदम, कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभागातील कृष्णा सोनटक्के, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील गणेश आवताडे, वेदांत उत्पात, सलोनी नदाफ, अमोल डोके, धनश्री पवार, दत्तात्रय कवळे, रविकांत व्हानद्राव, सौरभ दिघे, रोहित शिंदे, संग्राम भोसले, गणेश चोपडे, राजेंद्र गिरी, शुभम गाडेकर,सुशांत चव्हाण, राहुल दाबाडे, अमित विटेकर, अजय हेडगिरे, मयूर नलवडे,अभिजित वाकडे, सुरज देवमारे, सुरज डोके, रणजीत रणदिवे, ओंकार चटके, सुरज करांडे, भारत इंगोले, रविराज पाटील, मदनराव जगताप, ओंकार माने आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हूवद्वारे मधुन निवड करण्यात आली आहे .
अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता, जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोक-या देऊन पंढरपुर सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात दमदार वाटचाल केली आहे. सिंहगड संस्थेतील शिक्षक विद्यार्थ्यांना तन-मन-धनाने ज्ञान दानाचे काम करीत आहेत. गुणवत्ता पुर्ण शिक्षण हेच सिंहगड संस्थेचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखुन शिक्षण देणा-या पंढरपूर सिंहगड संस्थेतुन आज हजारो विद्यार्थी मोठ-मोठ्या जगातील नामांकित कंपनीत नोकरी करीत आहेत. महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणप्रणाली मुळे प्रत्येक विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहत आहेत. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जात असून प्रत्येक विद्यार्थ्यांची सिंहगडला पसंती असून इंजिनिअरचा किंगमेकर, स्टार इंजीनियर तसेच स्मार्ट महाविद्यालय स्मार्ट इंजीनियर फक्त पंढरपूर सिंहगड मध्ये घडविले जातात.
जस्ट डाईल या कंपनी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. संपत देशमुख, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. अनिल निकम, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा. अमित भादुले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.





0 Comments