पंढरपूर- पंढरपूर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपुरच्या स्वेरीचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून एकूण २०० जणांनी योगदान देत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुरातील मंदिर परिसरात वारीपुर्व महास्वच्छता अभियान राबविले.
उच्चतंत्र शिक्षण क्षेत्रात ‘पंढरपूर पॅटर्न’ मुळे राज्यात नव्याने ओळख निर्माण केलेल्या स्वेरीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी भागातील विद्यार्थ्यांना देखील प्रगतीच्या दिशेने नेत असताना सामाजिक बांधिलकीची जोपासना केली आहे.
शिक्षणाबरोबरच विधायक व सामाजिक कार्यात देखील स्वेरी सातत्याने सहभाग नोंदवीत असते. वारीकाळात निर्मल वारी, निसर्ग वारी, स्वस्थ वारी, स्वच्छ वारी असे उपक्रम अनेक वर्षे स्वेरी उत्साहाने राबवीत आहे. नेहमीप्रमाणे यंदा देखील आषाढी एकादशीच्या निमित्ताने शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या हाकेला प्रतिसाद देत महाद्वार. प्रदक्षिणा रोड, दर्शन बारी, पत्राशेड, नदी पात्र व मंदिर परिसर स्वच्छ केला. हे अभियान स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, प्रा. यशपाल खेडकर, डॉ. आर. एन. हरिदास, प्रा. एस. एम. शिंदे व प्रा. करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रीय सेवा योजना’ व ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविली.









0 Comments