आत्तापर्यंत ४३५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यात निवड
पंढरपूरः-‘विप्रो’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली असून सन २०१८-१९ मध्ये विविध नामांकित कंपन्यांमध्ये एकूण ४३५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
आय.टी. क्षेत्राशी संबंधीत पुणे येथील विप्रो या बहुराष्ट्रीय कंपनीने एन.एल.टी.एच या देशपातळीवरील ऑनलाईन अॅप्टिट्यूड टेस्टद्वारे घेतलेल्या परीक्षेतून विद्यार्थ्यांची निवड केली. कंपनीचे एच.आर. सनी ठाकर व त्यांच्या निवड समितीने या प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनीअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील तेजश्री पिटके, दीक्षा येरगट्टीकर, शुभम मस्के आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील दीपक चौधरी अशा चार विद्यार्थ्यांची विप्रो बहुराष्ट्रीय कंपनीत निवड करण्यात आली आहे.
श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये दररोज नवनवीन व आंतरराष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या येतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, प्रा. डी.ए. कुंभार व प्रा.एस.व्ही.दर्शने आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभा गप्रमुख, इतर अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.




0 Comments