पंढरपूर (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून लाखों वारकरी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला येणार आहेत. भंडीशेगाव येथे सर्व संतांच्या पालखी विसावा घेत असल्याने पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी भंडीशेगाव पालखी तळाची स्वच्छता केली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज या संतांच्या पालखी भंडीशेगाव येथे मोठ्या प्रमाणात विसावा घेत असतात. या पालखी तळाची स्वच्छता वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. म्हणून पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भंडीशेगाव येथे जाऊन पन्नास विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन कचरा गोळा करून योग्य जागी विल्हेवाट लावली.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी जागेची स्वच्छताच नव्हे तर वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी दोन दिवसाची शिबीरही ठेवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्राध्यापक चंद्रकांत देशमुख यांनी यावेळी सांगितले.





0 Comments