पुरामुळे पंढरपूर तालुक्यातील 30 गावच्या 7513 कुटुंबांचे स्थलांतर... पुरग्रतांना आवश्यक ती मदत देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्‍वासन


भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावातील कुटुंबांना स्थलांतरीत व्हावे लागले आहे. एकुण 30 गावातील 7513 कुटुंबांस पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे स्थलांतरीत व्हावे लागले आहे. पंढरपूर शहरातही नदीकाठच्या अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना आपले सांसारिक साहित्य घेऊन सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. दरम्यान आज पालकमंत्री विजय देशमुख यांनी रामबाग येथे स्थलांतरीत झालेल्या पुरग्रस्त नागरिकांची भेट घेवुन पाहणी केली. यावेळी पुरग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले.  

तालुक्यातील स्थलांतरीत कुटूंबाची लोकसंख्या
पटवर्धन कुरोली (460), शिरढोण (513), खेडभाळवणी (285), शेळवे (363), व्होळे (1130),  पि.कुरोली (563), वाखरी (78), वाडीकुरोली (263), देवडे (426), कौठाळी (38), पुळूज (63), आंबेचिंचोली (5), आंबे (128), गोपाळपूर (61), मुंढेवाडी (9), उंबरे (35), करोळे (285), सुस्ते (1005), भटुंबरे (135), नांदोरे (413), गुरसाळे (335), शेगाव दुमला (445), इश्‍वर वठार (63), चिंचोली भोसे (38), अजनसोंड (313), देगाव (110), ना. चिचोली (130), खेडभोसे (76), सरकोली (10) आवे-तरटगांव (35)  
एकूण 7513

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

पुरग्रस्तांना आवश्यक ती मदत देणार- पालकमंत्री विजय देशमुख



पंढरपूरदि. 07 :- वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरपरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असूनपूरग्रस्तांना आवश्यक मदत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले.
  पंढरपूर येथील रामबाग येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्तांची पालकमंत्री देशमुख यांनी भेट घेतली. यावेळी आमदार प्रशांत परिचारकआमदार भारत भालकेनगराध्यक्षा साधना भोसलेउपविभागीय अधिकारी सचिन ढोलेउपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडेतहसिलदार मधूसूदन बर्गेगटविकास अधिकारी रविकिरण घोडकेमुख्याधिकारी अनिकेत महानोर तसेच नगरसेवक आदी उपस्थित होते.

_________________________________________________


_________________________________________________

यावेळी श्री. देशमुख  म्हणालेपुणे परिसरात  मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने वीर व उजनी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे निरा व भीमा नदी काठच्या गावांत व पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी काठच्या भागात पाणी आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरपरस्थितीमुळे स्थ्ंलातरीत झालेल्या कुटूबांना प्रशासनामार्फत आवश्यकती मदत करण्यात येत आहे. त्यांची कोणतेही गैरसोय होणार नाही त्यांना लागेल ती मदत तातडीने पुरवण्यात येतील.


प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी  पूरग्रस्तांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची  माहिती दिली. त्यामध्ये आरोग्य विभागाकडून औषधोपचारस्वच्छ पिण्याचे पाणीभोजन व्यवस्थापुरवठा विभागामार्फत धान्य व केरोसिन वाटप आदीबाबतीची माहिती दिली तसेच आवश्यक तात्काळ मदतीसाठी प्रशासनातील सर्व विभाग सज्ज असल्याचे सांगितले.
 पूरग्रस्तांनी समस्या मांडल्या त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी संबधित विभागाला दिले.
        पालकमंत्री देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठच्या शिरढोणकौठाळी  गावांना भेट देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती घेतली.  

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments