पंढरपूर 21 :- मंगळवेढा तालुक्यामध्ये भिमा नदीकाठ व उजनी कॅनॉल येथे मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोई झालेल्या आहेत. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात शेतकर्यांच्या मोटर कनेक्शनची संख्या वाढली आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील सध्या सुरू असलेल्या उपकेंद्रामधून पुरेशा क्षमतेने वीज पुरवठा होत नव्हता त्यामुळे मौजे सिध्दापूर येथे 33 केव्ही उपकेंद्र होणेसाठी तेथील शेतकर्यांनी आमदार प्रशांत परिचारक यांचेकडे मागणी केली होती.
सदर मागणीचा विचार करून मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे 33 केव्ही उपकेंद्र होणेसाठी आमदार प्रशांत परिचारक यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे लेखी पत्राद्बारे मागणी केलेली होती. त्याअनुषंगाने मंत्री महोदयांनी बुधवार दि.21/08/2019 रोजी सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक, श्री.साबु दिनेश्चंद्र, डायरेक्टर प्रोजेक्ट, महावितरण, मुंबई व श्री.खंडाई, टेक्नीकल डायरेक्टर, महावितरण, मुंबई, इतर अधिकारी यांचेसमवेत मुंबई येथे बैठकीचे आयोजन केलेले होते. यावेळेस सिध्दापूर येथील बापूराया चौगुले, जालिंदर व्हनुटगी, आप्पासो चौगुले, परसु कोळी, निगय्या स्वामी आदी उपस्थित होते.
मौजे सिध्दापूर, ता.मंगळवेढा येथील 33 केव्ही सबस्टेशन प्रस्तावीत असून सदर सबस्टेशनला अद्याप निधी मिळाला नसल्याने सबस्टेशनचे काम सुरू करणेत आलेले नाही. सदरच्या सबस्टेशनाला मंजूरी देवुन लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा टेंडर प्रसिध्द करून लवकरात लवकरत काम सुरू करण्याच्या सुचना ऊर्जा मंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधीत अधिकार्यांना दिल्या.
मौजे सिध्दापूर येथील 33 केव्ही सबस्टेशन झाल्यास शेतकर्यांना चांगल्या दाबाने वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे तेथील शेतकरी व स्थानिक नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________







0 Comments