पुणे दि. 21: पुणे विभागातील प्रामुख्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू पूरग्रस्तांपर्यंत आवश्यक ती मदत उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्यामुळे स्वयंसेवी संस्था तसेच दानशूर व्यक्तींनी विभागीय अथवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आपणहून पुढे येवून पूरग्रस्तांना मदत करावी, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे विभागातील प्रामुख्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीच्या अनुषंगाने स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींसोबत आज कौन्सिल हॉल येथे डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण, पुरवठा विभागाच्या उपायुक्त निलीमा धायगुडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, दानशूर व्यक्ती तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, उद्योगपती उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पूरग्रस्तांना आतापर्यंत आवश्यक त्या स्वरुपात मदत देण्यात येत असून राज्य शासनाच्या वतीने रोख रक्कमेच्या माध्यमातूनही मदत वाटप करण्यात येत आहे. पूरामुळे सुमारे 3 हजार 500 घरे पडल्याची आतापर्यंत नोंद झाली आहे. पडलेली घरे उभी करण्यासाठी तसेच पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासन मदत करणार आहे. समाजातील दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांमार्फत जमा होणारी मदत जिल्हा प्रशासनामार्फत गरजू पूरग्रस्तांपर्यंत पोहचविण्यात येईल. संबंधितांना द्यावी, अशा सूचना उपस्थितांनी केल्या.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
प्रशासनाकडे जमा झालेल्या आवश्यक त्या वस्तूंची मदत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाठविण्यात आली आहे. सध्या या भागातील शाळा सुरु झाल्या असून पूरबाधित विद्यार्थ्यांना बालभारतीच्या वतीने पुस्तके पुरविण्यात येणार असून उर्वरित शालेय साहित्य उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. वही, पेन, पेन्सिल अशा विविध प्रकारच्या आवश्यक शैक्षणिक साहित्याच्या 2 लाख 20 हजार किटची या भागात गरज होती.
त्यापैकी 1 लाख 5 हजार शैक्षणिक साहित्याचे किट उपलब्ध झाले आहे, असे त्यांनी सांगितले. पूरग्रस्तांना मदत करावयाची इच्छा असणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त निलीमा धायगुडे 7038174466, सांगली जिल्ह्यासाठी अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण 7709512414, कोल्हापूर जिल्ह्यासाठी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण 9763212813 या क्रमांकावर संपर्क साधावा.
पूरग्रस्तांना आवश्यक असणाऱ्या गरजेच्या वस्तूंचे स्वरुप वेळोवेळी बदलले जाईल, हे ध्यानात घेवून स्वयंसेवी संस्था व संबंधित व्यक्तींना समाजमाध्यमाच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती देण्यात येईल, असे उपायुक्त्त संजयसिंह चव्हाण व निलीमा धायगुडे यांनी सांगितले.
बैठकीला स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, दानशूर व्यक्ती व उद्योगपतींनी विविध वस्तूंच्या किटच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत देण्यात येईल, असे सांगून विविध सूचना केल्या. पूरग्रस्तांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची माहिती वेळोवेळी अद्ययावत करावी, मदत पोहचविण्यात आल्याबाबतची माहिती
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments