चंद्रभागेच्या पुराचे संग्रहीत छायाचित्रं
पंढरपूर, दि. 14 :- वीर व उजनी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे भीमा नदी काठी निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तालुक्यातील आतापर्यंत 975 कुटूबांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी 10 हजार रुपयांप्रमाणे 97 लाख 50 हजार रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.
धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे तालुक्यातील नदी काठावरील 43 गावांत व पंढरपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरीकांना घरातील भांडी, कपडे, घरगुती वस्तूच्या नुकसानीकरीता शासनाच्या वतीने मदत देण्यात येत आहे. पूरस्थितीमुळे तालुक्यात एकूण 4 हजार 790 कुटूंब बाधित झाली असून, आतापर्यंत 3 हजार 654 कुटूंबांचे पंचनामे झाले असून, त्यापैकी 975 बाधितग्रस्त कुटूंबांच्या बँक खात्यावरती 97 लाख 50 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच त्यांना 286.7 क्विंटल गहू व 286.7 तांदूळ पुरवठा करण्यात आला असल्याचेही तहसिलदार बर्गे सांगितले.
तालुक्यातील पात्र बाधितग्रस्त प्रत्येक कुटूंबांला शासनाच्या वतीने मदत देण्यात येणार आहे. ही मदत थेट बाधितग्रस्तांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही तहसिलदार बर्गे यांनी सांगितले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments