पंढरपूर,प्रतिनिधी- सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात राज्यभरातून मदतिचा ओघ सुरु झाला असून पंढरपूर शहर व तालुक्यातूनही मोठी मदत जात आहे.उपरी(ता.पंढरपूर)येथील ग्रामस्थांनी थेट पुरग्रस्तांच्या भेटी घेत त्यांच्या घरांपर्यत मदत पोहचवली आहे.
पुरग्रस्तांच्या मदतिला हजारो हात धावून जात आहेत.त्यामुळे सामाजिक बांधीलकि जपन्यामध्ये सतत अग्रेसर राहणार्या उपरी गावातील तरुणांनी ग्रामस्थांना आवाहन केल्या नंतर अवघ्या काही तासातच पुरग्रस्तांकरीता मोठी मदत एकत्र केली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
2 ते 2.5 हजार चपात्या,चटणी,20 पिण्याच्या पाण्याचे बॉक्स,फरसाण व बिस्कीट पुडे,मच्छर कॉलइल्स ,ओल्या शेंगा आदी सामान एकत्र करुन थेट कृष्णा नदीकिनारीवर असलेल्या व महापुराच्या पाण्यात 4 ते 5 दिवस सापडलेल्या नागराळे या गावात थेट सर्व मदत पोहचवली.पुरग्रस्तांकरीता सुरु असलेल्या बहुतांश मदत केंद्रांमध्ये सर्व मदत एकाच ठिकाणी संकलीत केली जात असल्यामुळे प्रत्यक्ष महापुराचा फटका बसलेल्यांपर्यत मदत मिळण्यात उशीर होत असून काही गावांमध्ये याबाबत राजकारणही केले जात आहे.त्यामुळे गावातील तरुणांनी पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले व तहसिलदार मधूसूदन बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील कृष्णा काठच्या नागराळे गावात थेट बाधितांच्या घरापर्यत मदत पोहचवली आहे.
नागराळे गावातील प्रत्येक घरापर्यत थेट मदत आल्यामुळे ग्रामस्थांनी अश्रुंना आवर घालत उपरीकरांचे आभार मानले असून याप्रमाणेच इतरही दात्यांनी थेट बाधीत ग्रामस्थांपयर्ंत मदत दिली तर कोणीही मदतीपासून वंचित राहणार नसल्याचीही प्रतिक्रीया महापुराची झळ बसलेल्यां ग्रामस्थांनी यावेळी दिली.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments