पंढरपूर (प्रतिनिधी):- युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेशराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भक्ती जल च्या वतीने कर्मयोगी विद्यानिकेतन येथील विद्यार्थ्यांसाठी 4 संगणक संचाची (कॉम्युटर्स) भेट देण्यात आली. समाजसेवक सनी मुजावर यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मर्चंट बँकेचे चेअरमन नागेशकाका भोसले हे होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
कार्यक्रमासाठी पांडुरंग प्रतिष्ठानचे ट्रस्टी सी.एन.देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष विशाल मलपे, प्रगतशील बागायतदार सुभाष फाटे, महामुद मुजावर गुरुजी, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, धर्मराज घोडके, भागवत शिंदे, माजी नगरसेवक तुकाराम राऊत, आदींसह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सनी मुजावर यांनी हा उपक्रम राबविण्यामागचा हेतु स्पष्ट करताना सांगितले की, ‘‘उमेशराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणुन शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त पडतील अशा संगणकांची ही भेट देण्यात येत आहे. समाजाचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेशराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य करण्यास आम्हाला सतत उत्साह व प्रेरणा मिळत असते.’’ असे बोलुन त्यांनी परिचारक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी बशीर शेख व गुरुनाथ अभ्यंकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
_________________________________________________
_________________________________________________
कर्मयोगी विद्यानिकेतन च्या विद्यार्थ्यांसाठी भक्तीजलने दिलेली ही भेट अनमोल असुन वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन भक्तीजल ने दिलेले हे सामाजिक योगदान कौतुकास्पद आहे. असे मत व्यक्त करत प्रिंसीपल शैला कर्णेकर व रजिस्ट्रार गणेश वाळके यांनी भक्तीजलचे व सनी मुजावर यांचे आभार मानले.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments