पंढरपूर- चेतना बहु उद्देशीय संस्था संचलित वनराई ग्रुप पंढरपूरतर्फे गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या भव्य प्रांगणात ७० वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्मीळ औषधी वनस्पतीचे वृक्षारोपन करण्यात आले. वृक्ष संगोपन आणि वृक्ष जतन करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पंढरपूरच्या वनराई ग्रुपचे सौ गौरी ख्रिस्ते, सौ. वर्षा चंकेश्वरा, प्रमोद कुलकर्णी व सागर राहिरकर हे स्वेरीत वृक्षारोपन करण्यासाठी प्रत्यक्ष आले होते.
___________________________________________
_______________________________________________________________________________
त्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये इन्शुलीन, समुद्र्वेल, सब्जा तुलस, गोंडा, शनवरी, गुळवेल, मेडसिंगी, महारोग, अर्जुन तुळस, इर्पूर, वनतुळस, बेडकीपाला,कडूनिंब अशा विविध स्वरूपाच्या दुर्मिळातील दुर्मीळ होत चाललेल्या ७० औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड स्वेरीज् फार्मसीच्या आवारात करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, प्रा. राम नाईकनवरे, प्रा. कुलदीप पुकाळे, प्राद्यापक वर्ग यांच्यासह बी. फार्मसीचे सर्व विद्यार्थी आणलेली प्रत्येक रोपे, योग्य अंतरावर खड्डे खणून त्यात लावत होते.
_______________________________________________________________________________
_________________________________________________________________________________
लावलेल्या रोपांजवळ त्या रोपांची माहिती असलेले फलक देखील लावण्यात येत होते. आजकाल वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे पक्षांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. यामुळे नैसर्गिक देणगी असलेल्या पक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या वृक्षांची संख्या देखील कमी होत आहे. हे पाहून पंढरपुरातील वनराई ग्रुपने ‘एकच ध्यास, वृक्षांचा हव्यास’ या धोरणाने ठिकठिकाणी उपक्रम राबवून वृक्षांचे महत्व पटवून देत आहेत.
_________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
यासाठी ठिकठिकाणी पक्षाच्या संगोपनासाठी वृक्षरोपन करत आहेत. यावेळी वनराई ग्रुपच्या सौ गौरी ख्रिस्ते म्हणाल्या की, ‘आज ठीक ठिकाणी निरुपयोगी व केवळ दाट सावली मिळते म्हणून वृक्ष लावली जात आहेत. परंतु जर पक्षांना आवश्यक असणारी झाडी, वृक्षे लावली तर भविष्यात निसर्गाने दिलेल्या विविध रंगांचे पक्षी पाहण्यास मिळतील. यासाठी औषधी रोपांची व गरजेच्या वृक्षांची रोपण करून प्रथम पक्षांना वाचविणे गरजेचे आहे. यासाठी हा उपक्रम आम्ही ठीक ठिकाणी राबवीत आहोत. दाट सावली देणारे वृक्ष लावण्यापेक्षा पक्षांना आवश्यक असणारी झाडे लावण्याची गरज आहे.’ असे सांगून औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती दिली. यावेळी बी. फार्मसीचे प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments