पुर परिस्थिती पहाता पंढरपूर शहरातील नागरिकांनी सतर्क रहावे –आ.प्रशांतराव परिचारक

  


संपुर्ण महाराष्ट्र व देशात सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले असुन सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पुणे, उजनी, वीर व भाटघर धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाउस पडत असल्याने या धरणांमधुन निरा व भिमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे पंढरपूर येथे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असुन आज जुना दगडी पुल पाण्याखाली गेला आहे. पंढरपूर शहरामध्ये निर्माण होणारी पुरजन्य परिस्थिती नियंत्रणात रहावी  यासाठी आमदार प्रशातंराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, बांधकाम समिती सभापती सुजितकुमार सर्वगोड, आरोग्य समिती सभापती अक्षय गंगेकर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित केली होती. 
      ___________________________________________



यावेळी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी वीर, भाटघर व उजनी धरणांतुन भिमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यास शहरातील अनिल नगर, व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण झोपडपट्टी, लखुबाई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर  झोपडपट्टी व भजनदास चौक, जुनी पेठ या भागात पाणी येते. त्यामुळे त्या भागातील असलेल्या नगरसेवकांनी दक्ष राहुन होणा-या आपात्कालीन परिस्थीतीस तोंड देण्यासाठी पुरग्रस्त नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे, तसेच त्यांना आवश्यक असणा-या सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सुचना देण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पुरामुळे आपात्कालीन परिस्थीत उद्भवल्यास ७४ नगरपरिषद कर्मचा-यांची पुर नियंत्रणकरिता आदेश काढण्यात आलेले आहेत. पुर परिस्थीती वेळी नदीतील धोक्याची पातळी व पाण्याच्या विसर्ग पुढीलप्रमाणे आहे. पुरपरिस्थातीवेळी अंदाजे इशारा पातळी ४४३मी.- ११६२५८ क्युसेक्स, धोका पातळी ४४५ मी.-१८७१६८ क्युसेक्स, जुना पुल ४३९ मी.- ३२०००क्युसेक्स, गोपाळपुर जुना दगडीपुल ४४३ मी.- १२५९३२ क्युसेक्स, गोपाळपुर नविन पुल ४४४ मी.- १६४५५६ क्युसेक्स, सोलापूर रोड नविन पुल ४४७.२००मी.- २२५००० क्युसेक्स. सर्वसाधारण अंदाजे १३०००० क्युसेक्सला व्यास नारायण झोपडपट्टी१६०००० क्युसेक्सला गोपाळपुर नविन पुल, २२५००० क्युसेक्सला संतपेठ, गोविंदपुरा भाग, ३००००० क्युसेक्सला कबीर मठ, जुनी न.पा.इमारत, ३१०००० क्युसेक्सला दत्तघाट, माहेश्वरी धर्मशाळा, आमदार परिचारक वाडा, कालिकादेवी मंदिर चौक याप्रमाणे अंदाजे पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांनी सतर्क रहावे हि नगरपरिषदेच्यावतीने देण्यात येत आहे.

यावेळी पाणीपुरवठा समिती सभापती रेहाना बोहरी नगरसेवक विक्रम शिरसट संजय निंबाळकर, विशाल मलपे, विवेक परदेशीमालोजी शेंबडे, श्रीनिवास बोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र डांगे, भागवत बडवे, बसवेश्वर देवमारे, धर्मराज घोडके, सचिन शिंदे नगरअभियंता दिनेश शास्त्री, पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता संदेश मोरे तसेच नगरपरिषदेचे अधिकारीकर्मचारी हे उपस्थित होते.
____________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

1 Comments

  1. एनडीआरएफ व सामाजिक संघटना, शासकीय यंत्रणा यांनी समन्वयातून काम करणे गरजेचे आहे

    ReplyDelete