मुंबई, दि. १९ : आदिवासी समाजातील रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान होण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.
आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य विषयक उपक्रमाबाबतआढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली.
त्यावेळी ते बोलत होते. डॉ. परिणय फुके म्हणाले, आदिवासी समाजातील रुग्ण व आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आदिवासी विभागाची जबाबदारी आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
एखादा रुग्ण गंभीर आजाराने त्रस्त असल्यास त्याच्यावर वेळेत उपचार व्हावेत यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना वेळेत आधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसह सर्व आदिवासी समाजासाठी सिकल सेल नियंत्रण कार्यक्रम राबविण्याबाबतचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले. या दरम्यान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. वी.आर श्रीनिवास, आदिवासी विकास आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी, आदिवासी विकास विभागाचे उप सचिव श्री.ढोके, पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील विश्लेषक अभिषेक किनिंगे, नव उद्योजक व युवा संशोधक यशराज भारद्वाज, सी.एम.फेलो डॉ. साफवान पटेल, डॉ. मयुर मुंडे तसेच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments