शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – प्र.कुलगुरू प्रा. डॉ. एस.आय. पाटील



                                         शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार
                                                 – प्र.कुलगुरू प्रा. डॉ. एस.आय. पाटील
                                    स्वेरीच्या बावीसाव्या स्थापना दिनी केले प्रतिपादन

पंढरपूर- ‘मी सात महिन्यापूर्वी सोलापूर विद्यापीठाचा प्र. कुलगुरुपदाची सूत्रे हाती घेतली. त्यापूर्वीपासूनच स्वेरीचे आणि डॉ.रोंगे सरांचे नाव ऐकून होतो. शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नव्या पद्धतीने शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रचंड विकासाकडे नेणाऱ्या या स्वेरीचे नाव आज राज्यात आदराने घेतले जात आहे. 

याचा मला सार्थ अभिमान वाटतो. डॉ. रोंगे सर देखील विद्यापीठाच्या व्यवस्थापन पदाचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा मला विद्यापीठाच्या कार्यात खूप मदत होते तसेच विद्यापीठातील सुद्धा सर्व विभागाची मदत मिळत आहे. 

सर्वांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या अभ्यासाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्याकडे माझा कल राहील.’असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. एस. आय. पाटील यांनी केले.

श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूरच्या बावीसाव्या स्थापना दिनानिमित्त स्वेरीमध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्र. कुलगुरु डॉ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी पटना (बिहार) येथील आयकर उपायुक्त सुनिल आगावणे हे होते. 



_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


प्रारंभी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी आपल्या प्रस्तावनेत स्वेरीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतची वाटचाल, केलेला संघर्ष आणि त्यातून मिळालेले यश याचा लेखा जोखा सादर करून ‘प्रयत्न केल्यास नशीब देखील साथ देते हे जाणवले आणि संघर्ष करताना पदोपदी अपमान देखील सहन करत राहिलो म्हणून आज हे सोनियाची दिवस पहायला मिळाले आणि या संघर्षातून एक जाणवले की, आपल्यांमध्ये अपमान सहन करण्याची ताकत निर्माण केल्यास माणूस पुढे जातो. 

त्यामुळे डोळ्यासमोर एकच उद्देश ठेवला आणि ध्येयवेडे होवून मार्गक्रमण करीत राहिलो. त्याचा परिणाम आपण सर्वजण पहात आहातच.’ असे सांगून त्यांनी स्वेरीच्या यशासाठी सहकार्य करणाऱ्या अनेकांचे आभार मानण्यास डॉ. रोंगे विसरले नाहीत. 

पायलट अंकुश गावंडे यांनीही आपल्या मनोगतातून ‘डॉ. रोंगे यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील नव्या पद्धतीमुळे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केले आहे. येथील वातावरण, संस्कृती,  शिस्त आणि संभाषण हे खूप महत्वाचे शिक्षण देत आहेत.’ असे सांगितले. 

पुढे बोलताना प्र. कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले की, ‘चांगले शिक्षण देताना विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षण घेण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे असे शिक्षण देण्याचा प्रयत्न राहील.’ असे सांगून ‘स्वेरीतील प्राध्यापकांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी आणि विकासासाठी फायदा करून घ्या.’ असेही आवाहन केले.



_________________________________________________


_________________________________________________

 अध्यक्षस्थानावरून बोलताना उपायुक्त आगावणे म्हणाले की, ‘आपले ध्येय निश्चित करा आणि त्या दृष्टीने वाटचाल करा. आपले व्यक्तिमत्व आणि विकास हे सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्या कार्याची जाहिरात आपणच करणे गरजेचे आहे.’असे सांगून सोलापुर विद्यापीठ हे केम्ब्रिज आणि ऑक्सपर्ड विद्यापीठाप्रमाणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

कार्यक्रमानंतर उपायुक्त आगावणे यांनी स्पर्धा परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, पात्रता आदी संबंधित बाबींची आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर माहिती दिली. पाहुण्यांनी स्वेरी कॅम्पसमध्ये वृक्षारोपण करून संपूर्ण माहिती जाणून घेतली.

 यावेळी आश्रयदाते संभाजीराजे आसबे, भोसले गुरुजी, पालक संघाचे दैठणकर, संस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विश्वस्त बी.डी. रोंगे, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डॉ. पडवळ, नागेश अधटराव, सोमनाथ गायकवाड, पत्रकार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रातील मान्यवर तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा यांनी आभार मानले.


_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments