स्वेरीला ‘बाटु’चे कुलगुरू डॉ. डॉ. व्ही. रामा सास्त्री यांची सदिच्छा भेट


 पंढरपूर-‘जर संस्थेचे व्यवस्थापन उत्तम असेल तर त्या संस्थेची प्रगती झपाट्याने होत रहाते.याचेच उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्वेरी’ अर्थात श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूर ही शैक्षणिक संस्था होय. ग्रामीण भागात असलेल्या परंतु शहरी विद्यार्थ्यांना देखील खुणावत असलेल्या व येथील व्यवस्थापनाचे नियोजन अप्रतिम असल्यामुळे महाराष्ट्रातील इतर महाविद्यालयांच्या तुलनेत या ‘स्वेरी’ अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसी या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी महाविद्यालयांची प्रगती अतुलनीय अशी झाली आहे.’ असे प्रतिपादन लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. व्ही. रामा सास्त्री यांनी केले. 
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये लोणेरे (जि. रायगड) येथील ‘बाटु’ तथा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल युनिव्हर्सिटी’ चे कुलगुरू डॉ. व्ही. रामा सास्त्री हे स्वेरीतील प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी वरील गौरवोदगार काढले. प्रारंभी कॉम्प्यूट सायन्स अॅण्ड इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी प्रतिक्षा प्रदीप तोडकर यांचे अकस्मात निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पित करून कार्यक्रमाला सुरवात झाली. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून १९९८ साली स्थान झालेल्या या महाविद्यालयाची जडण घडण, वार्षीक परीक्षेचा निकाल, कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी असलेली ‘कमवा आणि शिका’ योजना, मिळालेले बहुमान आणि संशोधनासाठी मिळालेला निधी, सुरु असलेल्या संशोधन प्रकल्पांची सविस्तर माहिती सांगितली. 
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

पुढे बोलताना प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. रामा सास्त्री म्हणाले की, ‘शिक्षकांनी विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यास अशी प्रगती शक्य आहे. पहिल्यापासून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या महाराष्ट्रात अशा महाविद्यालयांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्राध्यापकांच्या माध्यमातून होत असलेला शैक्षणिक पाठपुरावा निश्चितच अनुकरणीय आहे. स्वेरीमधील हाय स्पीड इंटरनेट सुविधा, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  जवळच्या गावातील शाळांशी जोडलेले संबंध व त्यातून ज्ञानाची देवाण घेवाण ह्या गोष्टी खरंच स्तुत्य आहेत.’ असे सांगून अभियांत्रिकी, फार्मसी आणि हॉटेल मॅनेजमेंट विभागांची माहिती कुलगुरूंनी दिली. 

________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________

यानंतर प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. सास्त्री म्हणाले की, ‘संशोधन मल्टी डिसिप्लीनरी असले तर देश प्रगतीपथावर जाईल. तसेच त्यांनी बाटुचे कार्यक्षेत्र व कामकाजाची पद्धत सांगितली.  यावेळी सोबत डॉ. सीता, डॉ. अतुल सराफ याच्यासह डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, प्रवेश अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार शैक्षणिक अधिष्ठाता डॉ प्रशांत पवार यांनी मानले
________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments