• विविध महाविद्यालयातील २१० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
पंढरपूर (प्रतिनिधी) अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड काॅलेज मधील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी महाविद्यालयात "ॲप्टीटेक २के१९" या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
______________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागात शनिवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी ॲप्टीटेक २के१९ या विद्यापीठात स्तरीय स्पर्धेचे उदघाटन सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. चेतन पिसे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना स्वतःचे कौशल्य विकसत होण्यासाठी मदत होणार आहे. जगातील नामांकित कंपन्यामध्ये प्लेसमेन्ट होण्यासाठी या स्पर्धेचा खुप मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. या शिवाय शासकीय सेवेत नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक ज्ञान या स्पर्धेतून मिळणार असल्याने विद्यार्थी वर्गातुन हि स्पर्धा आयोजित केल्याबद्दल सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आभार व्यक्त होत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या अंतर्गत असलेल्या विविध शैक्षणिक ११ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये विविध महाविद्यालयातुन २१० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. महाविद्यालयाच्या वतीने सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच विजयी स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कुमार वृषभ जैन व कुमार सतिश जेवर्गी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यार्थी कुमार रूषभ पवार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक प्रतिनिधी प्रा. अमोल कांबळे व प्रा. मुरलीधर कुलकर्णी सह सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________





0 Comments