उपरी येथे पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन



पंढरपूर - सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी, 
पिण्याच्या पाण्याची परिस्थीती झाली बिकट
। पंढरपूर, प्रतिनिधी
जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण 100 टक्के भरल्यामुळे भीमा नदीला पुर आला आहे. मात्र दुसरीकडे पंढरपूर तालुक्यातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. उपरी ता. पंढरपूर येथे पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर येत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दिड तास चाललेल्या आंदोलनामुळे पंढरपूर - सातारा रस्त्यावर मोठी वाहुक कोंडी झाली होती. जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत रास्तारोको आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्यानंतर भीमा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी पाणी सोडण्याचे आश्‍वास देवून तात्काळ कारवाई केल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. 

उपरी ता. पंढरपूर येथील कासाळ ओढ्यामध्ये ग्रामपंचायतची पाणी पुरवठा विहीर आहे. पाऊस नसल्याने ओढा कोरडा पडला असुन पाणी पुरवठ्याच्या विहरीनेही तळ गाठला आहे. त्यामुले गावात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावाच्या शेजारून उजनी उजवा कालवा दुथडी वाहत आहे. मात्र ओढ्यातील विहीरीला पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांची पिण्याची पाण्यासाठी वणवन सुरू आहे. वारंवार उजनी विभागाच्या अधिकार्‍यांना सांगुनही अधिकारी पाणीपुरवठ्याच्या विहीरीला पाणी सोडण्याबाबत टाळाटाळ करत असल्यामुळेच ग्रामस्थांनी एकत्र येत शुक्रवारी पंढरपूर - सातारा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी 9 वा. सुरू झालेल्या आंदोलनास 10 वा. नंतर ही संबंधीत अधिकार्‍यांनी भेट न दिल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. 


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

जो पर्यंत पाण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरू असल्याचा इशाला दिल्यामुळे पोलीसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. 10.30 वा.च्या दरम्यान भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय कोंडेकर,पंढरपूर उपविभागाचे उपअभियंता एस.के. वडगांवरक, शाखा अभियंता आबासाहेब खांडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा पाण्यासाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना पोलीस प्रशासनाने शांततेचे आवाहन केले. त्यानंतर जो पर्यंत गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटत नाही तो पर्यंत पाणी देण्यात येईल असे आश्‍वासन भीमा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. या प्रसंगी मेन कॅनल जवळील एसक्यापची सिमेंट भिंत काढून त्या ठिकाणी लोखंडी दारे बसवावीत, वितरीका 24 अ ला मेन कॅनला पाणी आल्यावर त्वरीत पाणी सोडावे, प्रत्येक पाणी पाळीला कॅनलमधून कासाळ ओढ्यावरील बंधारा भरून मिळावा आदी मागण्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. या प्रसंगी सहकार शिरोमनीचे संचालक विलास जगदाळे, सरपंच शहाजी नागणे,  तंटामुक्त समितीचे मा. अध्यक्ष साहेबराव नागणे, नवनाथ आसबे, माजी सरपंच अर्जुन जाधव, सुनिल नागणे, प्रा. हणुमंत जाधव, सिव्हील इंजि.हणुमंत नागणे, सेवा सोसायटीचे चेअरमन संजय जगदाळे, चंद्रकांत जाधव, भारत नागणे, उपसरपंच आण्णासो नागणे, शहाजी जगदाळे, महेश नागणे, विक्रांत जगदाळे, तलाठी आर.एस.पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व तरूण उपस्थित होते. याप्रसंगी तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शना खाली एएसआय संजय राऊत यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments