सांगोला. ( प्रतिनिधी ) – ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून असे सांगोला नगरपरिषद च्या नगराध्यक्षा राणीताई आनंदा माने यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ पत्रकार शाहरुख मुलाणी यांच्या भाचीच्या बारस्या निमित्त आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रमात जानकर वस्ती येथे केले.
यावेळी माने म्हणाल्या की, या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. आज आपल्या देशातील महिलांचे आरोग्य ही चिंतेची आणि चिंतनाची बाब बनली आहे. ताठ मानेनं जगू पाहणाऱ्या या स्त्रीला आधार देणं आणि शहर व गावातील स्त्री जीवनातील दरी कमी करणं ही आज काळाची गरज आहे. आनंद काही क्षणा पुरता मर्यादित न ठेवता आयुष्यभर आनंद मिळणारी गोष्ट म्हणजे आरोग्य.आरोग्य उत्तम असल्यास जीवन आनंदीमय बनते. या महिलांचे आरोग्य हिच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. तालुक्यातील महिला सक्षमीकरण साठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करून महिलां सक्षम बनवू. तसेच नगरपरिषद क्षेत्रातील महिलांना रोजगार मिळावा म्हणून स्वयंरोजगार केंद्र बनून महिलांची आर्थिक परिस्थिती प्रगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. असे नगराध्यक्षा माने सांगितले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यावेळी शाहरुख मुलाणी म्हणाले की, आज मी जे काही माझे अस्तित्वा निर्माण केले आहे ते फक्त आई आणि बहिण यांच्या पाठबळामुळेच केले आहे. तर सुलेमान मुलाणी म्हणाले की, तालुक्यातून मी मुंबई ला अंगावरच्या कपड्यावर गेलो होतो. अर्थात शून्यातून हे सर्व निर्माण केले आहे. यामागे माझ्या पत्नी चे मोठे योगदान आहे.
दरम्यान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात जिल्हा ग्रामीण रुग्णालय सांगोला यांचे मोठे योगदान तथा सहकार्य लाभले. दरम्यान फरीदा मुलाणी, अंजुम शेख, सुनीता पाटील, गुलशन मुलाणी, चारुशीला बाबर, नजमीन मुलाणी, स्वाती पाटील, मयुरी गडहिरे, लक्ष्मी भडंगे, उषा टेकनर या महिलांनी आरोग्य शिबीर संपन्न करण्यास परिश्रम घेतले. यावेळी जाणकर वस्ती, नरुटे वस्ती वरील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर मंत्रालयातील माजी कर्मचारी दिलीप शेवडे हे उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments