पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात
केंद्रीय साहाय्यक पोलिस आयुक्त प्रियांका भोसले यांचे व्याख्यान
पंढरपूर (प्रतिनिधी) स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यासामध्ये नियमीतता असली पाहिजे. आपल्या आवडत्या विषयात जर करियर केले तर तुम्हाला लवकर यश प्राप्त होईल.ज्यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारीकरत असतात त्यावेळी बेसिक अभ्यास करणे अलीकडे खूप महत्त्वाचे आहे. दररोज वर्तमानपत्र वाचणे काळाची गरज आहे. यामुळे तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी समजतात आणि त्या समजल्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडते. मुलाखत देत असताना यावेळी कुठल्याही प्रकारेघाबरून न जाता मोठ्या धाडसाने व शांतपणाने उत्तरे दिली पाहिजेत.
जर मुलाखती घेत असलेल्या अधिकार्यांनी उलटसुलट प्रश्न विचारले तर घाबरू नका मुलाखतीच्या दरम्यान तुमचे ज्ञान किती आहे हे बघितले जाते. स्पर्धा परीक्षा विषयी हल्ली सोशल मीडियावर अनेक विविधप्रकारचे प्रश्न टाकून उत्तर विचारले जाते अशा फालतूक प्रश्नावर आपण उत्तर देऊ नका किंवा असे काही नसते. करिअरच्या दृष्टिकोनातून वेगळे अस्तित्व निर्माण करा आणि ते साध्य करण्यासाठी अभ्यास नियमितपणे करा. मेहनत घेतल्यावर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाहीअसे मत केंद्रीय सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियांका भोसले यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय बोलताना व्यक्त केले.
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा याविषयी मार्गदर्शन या यावर प्रियांका भोसले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली प्रियांका भोसले यांचा प्रा. अंजली चांदणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________







0 Comments