पंढरपूर- श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल कासेगावमध्ये भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
स्कूल कमिटीचे चेअरमन डॉ.सुधाकर पडवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त दादासाहेब रोंगे, शाळेचे व्यवस्थापक शरद रोंगे हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले तर सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह गीत आणि पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी पेट्रियोटिक देशभक्ती गीत सादर केले.
तसेच इयत्ता पहिली ते अकरावीचे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर केली. यामध्ये श्रेयस घाडगे आणि पूर्वा अवताडे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली प्राचार्या.डॉ.जयश्री चव्हाण म्हणाल्या की, ‘व्यक्तीच्या दिखाव्यावर नाहीतर तर त्याच्या अंतरंगातच नेतृत्व गुण असावे लागतात.’ असे सांगून भारताची सुवर्णकन्या हिमा दास हिची एक गोष्ट सांगितली. या कार्यक्रमानंतर सर्व मुलांना खाऊवाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षिता त्रिपुडे, समृद्धी लोखंडे, तर आभार मनस्वी गायकवाड, संस्कृती लोखंडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या वेळी या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे अध्यक्ष बी.डी.रोंगे उपाध्यक्ष एच.एम.बागल यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, यांच्यासह विद्यार्थी, सर्व शिक्षक वर्ग,पालक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments