देशभक्ती ही विचार आणि आचरणातून पुढे आली पाहिजे
श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये ७३ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पंढरपूरः-गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यु.पी. एस. सी. स्पर्धा परीक्षेच्या सेन्ट्रल आर्म्ड पोलीस फोर्सच्या परीक्षेत मुलींमध्ये भारतात प्रथम आलेल्या आणि असिस्टंट कमांडंटपदी विराजमान झालेल्या प्रियांका भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
भारतमातेच्या प्रतिमा पूजनानंतर साक्षी काळे, मानसी चाळकीकर व स्वप्ना सावंत या विद्यार्थीनींनी भारतातील राज्यघटनेपासून, संरक्षण व्यवस्था, सामाजिक परिस्थिती,बालमजुरी, संवेदनशील स्थिती, वस्तुस्थिती आणि भविष्यातील भारत यातील फरक तसेच महागाई व भ्रष्टाचार या विषयांपासून ते मिशन चांद्रयान -२ पर्यंत अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणे दिली तर भाग्यश्री भोंग यांनी ‘जय भारत वंदे मातरम ...’ हे गीत सुरेल आवाजात गावून देशभक्तीमय वातावरण निर्माण केले. ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणजे नेमके काय? हे सांगत असताना पुढे भोसले म्हणाल्या की ‘भारत हा युवकांचा देश आहे त्यामुळे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या क्षेत्रा व्यतिरिक्त अधिक देशव्यापी कार्य युवकांनी करणे गरजेचे आहे.
_________________________________________________
_________________________________________________
आज विकासाच्या विचारांची गरज आहे. स्वतः एन्जॉय करा पण आपण समाजाचे एक सदस्य आहोत हे विसरू नका.मागासलेल्यांना, अशिक्षितांना देखील पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा. आज भारताची लोकसंख्या १२० कोटींच्या पुढे गेली आहे तरी पण निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्यांची संख्या कमी का आहे? मतदान न करणाऱ्या नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा. देशभक्ती ही विचार आणि आचरणातून पुढे आली पाहिजे.’ असे सांगून स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून आत्मविश्वासाने पुढे आले पाहिजे’ असे सांगितले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘स्वेरीयन’ या त्रैमासिकाचे तसेच चारही महाविद्यालयाच्या विविध विभागांच्या सहामाई अहवालाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
यावेळी मंत्रालयातील महसूल विभागचे मुख्य सचिव पितांबर भोसले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या व्यवस्थापन विभागाचे सदस्य, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ,डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.करण पाटील, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर,सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, बालाजी सुरवसे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह चारही महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रतीक्षा साळुंखे, शितल नरळे व प्रा.यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.
_________________________________________________












0 Comments