प्रथम वर्ष अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांचे स्वेरीत उत्साहात स्वागत




  पंढरपूरः ‘विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना सतर्क राहून वाटचाल केली पाहिजे. शिक्षकांमार्फत करवून घेतलेला अभ्यास, प्रात्यक्षिक, सराव, आदी शैक्षणिक उपक्रम सांगतील तेवढे मनापासून अभ्यास करावा. स्वतःमधील इच्छा शक्तीला जागृत केल्यास आपण आपले इच्छित ध्येय कोणत्याही परिस्थितीत सहज साध्य करु शकतो.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले. 

  गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटसंचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजिलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे बोलत होते. 

  प्रारंभी सर्व विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. व्यासपीठावर पुरुष पालक प्रतिनिधी म्हणुन माधव खरात तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून ज्योती घाडगे ह्या उपस्थित होत्या. दिपप्रज्वलनानंतर प्रथम वर्ष विभागप्रमूख डॉ.एस.ए.लेंडवे यांनी प्रास्ताविकातून सर्वांचे स्वागत करून अभ्यासाला लागणारा कालावधीप्रॅक्टिस सेशन,रात्र अभ्यासिकाप्रश्नसंच सोडविणेपंढरपूर पॅटर्नअद्यावत सुविधाउपलब्ध साधनेअभ्यासाची पध्दतगरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी असणारी ‘कमवा व शिका’ योजना व आदींची सविस्तर माहिती दिली.



_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



   प्रिसिजन अॅटोमेशन रोबोटीक्स इंडिया (पारी) कंपनीचे मानव संसाधन आणि विकास अधिकारी डॉ. उदय  भोसले म्हणाले की, जगभरातील नोकरीच्या संधी प्राप्त करायच्या असतील तर इंग्रजी भाषेची भीती न बाळगता भाषा चांगल्या प्रकारे आत्मसात करावी. 

  या महाविद्यालयातील शिक्षण पद्धतीचे खूप कौतुक वाटते. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवितात यातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो. विद्यार्थ्यांनी कार्य करताना कामात प्रगल्भता आणावी कारण प्रत्येक कॅम्पस इंटरव्हयूवमधून कम्युनिकेशन स्कीलवर अधिक भर दिला जातो. 

  म्हणून विद्यार्थ्यांनी कम्युनिकेशन स्कीलला अधिक महत्व द्यावे.’ महिला पालक प्रतिनिधी म्हणून बोलताना सौ.ज्योती घाडगे म्हणाल्या की, ‘या महाविद्यालयात विद्यार्थांचे उत्तम करिअर घडवीत असल्यामुळे हे महाविद्यालय प्रवेश संख्या, वार्षिक परीक्षेचा निकाल आणि प्लेसमेंट यामध्ये अव्वलस्थानी राहण्यात सातत्य राखत आहे. प्रत्येक माहिती, परीक्षांचे गुण यांचा एस. एम. एस. व पत्रे पालकांना मिळतात. 

  यामूळे पालकवर्ग पाल्याच्या भविष्याबाबत निश्चिंत राहतात. पालक प्रतिनिधी म्हणून बोलतांना माधव खरात म्हणाले की, सध्याच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची गरज असते. त्याप्रमाणे स्वेरीत तसे उत्तम प्रकारे विद्यार्थी घडत आहेत. 

याठिकाणी रात्र अभ्यासिका सुरु असते ही बाब महत्वाची असून आता याची गरज आहे. करिअर करण्याच्या संधी सर्वांना सारखीच मिळते परंतु कोण कसा अभ्यास करतो यावर करिअर अलंबून आहे.


_________________________________________________


_________________________________________________



 महाविद्यालयाचे व्यवस्थापन उत्तम असल्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत.’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पवार यांचा सत्कार करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना डॉ. पवार म्हणाले की, हा सत्कार आपल्या माणसांसमोर होतो आहे. 

याहून अधिक आनंद दुसरा कोणताही नाही.’असे सांगून शिक्षण घेतानाचे अनुभव सांगितले. पुढे बोलताना सचिव व प्राचार्य डॉ.रोंगे म्हणाले की, ‘आदरयुक्त संस्कार व कठोर परिश्रम केल्यामुळेच विद्यार्थी यशस्वी होत असताना आपण होवून अभ्यास केल्यास त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. 

त्यासाठी यश हे मानसिकतेवर अवलंबून असते आणि यासासाठी मानसिकता तयार केली पाहिजे.’ असे सांगून शिक्षण घेत असतानाचा अनुभव सांगितला. तसेच उच्चतंत्रशिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध असून शैक्षणिक कर्जासाठीच्या ‘विद्यालक्ष्मी’ या शासकीय योजनेची सविस्तर माहिती देखील दिली. 

यावेळी सीजीपीए पॅटर्न नुसार १० पैकी १० गुण मिळविलेल्या बावीस विद्यार्थ्यांसह विद्यापीठात सर्वप्रथम आलेल्या गुणवंत आणि विविध विषयात सर्वप्रथम आलेय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज व वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम.पवार. प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, प्रवेश अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, जम्मू काश्मीर तसेच सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील विविध भागातील विद्यार्थी व त्यांचे पालक असे मिळून तब्बल एक हजार जण उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून आभार मानले





_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments