पंढरपूर 22 :- पंढरपूर-मंगळवेढा नदीकाठच्या पूरग्रस्त भागास भेटी दरम्यान तेथील नागरीकांनी, शेतकर्यांनी आमदार प्रशांत परिचारक यांचेकडे नदीवरील पुराच्या पाण्यामुळे नादुरूस्त झालेले बंधारे लवकरात लवकर दुरूस्त करणेसाठी विनंती केलेली होती.
त्याअनुषंगाने आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचेकडे भिमा नदीवरील नादुरूस्त बंधार्यास पुर नुकसान दुरूस्ती (प्लड डॅमेज रिपेअरींग) या योजनेतून लवकरात लवकर निधी उपलब्ध होवुन सदरचे बंधारे दुरूस्त करून मिळणेसाठी लेखीपत्राद्बारे विनंती केली होती.
सदर नादुरूस्त बंधारे दुरूस्त करून मिळणेचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केलेला असून मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी सदरच्या नादुरूस्त बंधार्यास पुर नुकसान दुरूस्ती (फ्लड डॅमेज रिपेअरींग) या योजनेतून अंदाजे रू.10.00 कोटी निधी देवुन लवकरात लवकर बंधारा दुरूस्तीचे काम केले जाईल असे आश्वासन दिले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
पंढरपूर तालुक्यातील मौजे करोळे, आव्हे, पिराची कुरोली, गुरसाळे, मुंढेवाडी, पुळुज व मंगळवेढा तालुक्यातील बठाण, माचणुर, सिध्दपूर आणि अरळी येथे आमदार प्रशांत परिचारक यांनी पूरग्रस्त भागास भेट दिली होती.
यावेळी भिमा नदीवरील बंधार्याची पाहणी केली असता पुराच्या पाण्याने बंधार्यावरील गुंतावा भिंत, भराव व पिचींग, तटरक्षक भिंत या कामाचे पुराच्या पाण्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व काही बंधार्याचे दरवाजे(बर्गे) व चॅनेल पुराच्या पाण्यामुळे वाहुन गेले आहे.
त्यामुळे तेथील स्थानिक शेतकरी व नागरीकांनी हे नादुरूस्त बंधारे लवकरात लवकर दुरूस्त करणेसाठी मागणी केली होती. सदर नादुरूस्त बंधार्यात पाणी असून सुध्दा पाणी साठवता येणार नसल्याने सदरचे बंधारे लवकरात लवकर दुरूस्त करून बंधार्यातील वाहुन जाणारे पाणी अडविल्यास तेथील शेतकर्यांच्या शेतातील पिकांना पाणी मिळाल्याने त्याचा त्यांना फायदा होईल.
_________________________________________________
_________________________________________________
मागील वर्षी कोरडा दुष्काळ होता. परंतु यावर्षी भिमा नदीमध्ये पाणी असून सुध्दा बंधारे नादुरूस्त असल्याने पाणी साठवता येणार नाही. त्यामुळे सदरचे बंधारे दुरूस्त होणे गरजेचे आहे. सदरचे बंधारे दुरूस्त झाल्यास बंधार्याती पाणी साठ्ल्यास तेथील परिसरातील नागरीकांना, शेतकर्यांना, जनावरांना त्याचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकर्यांच्या पिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होईल.
त्यामुळे वरील बंधार्यांच्या कामांना अंदाजे रू.10.00 कोटी रूपये तातडीने मंजूर होणार आहे. त्यामुळे तेथील स्थानिक नागरीक व शेतर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments