'एनएसएस' विद्यार्थ्यांचे काम समाज उभारणीचे - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर




पुणे दि. 22: पूरामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील जनतेचे अपरिमित नुकसान झाले आहे. संपत्तीच्या नुकसानीबरोबरच लोकांची मनेही खचली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीला जावून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनएसएस’चे विद्यार्थी समाज उभारणीचे काम करत असल्याचे गौरोद्गार विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज काढले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाचे पाचशे विद्यार्थ्यांचे पथक पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मदत व पुनर्वसनाच्या कामाला पाठविण्यात आले. या पथकाच्या गाड्यांना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या वेळी डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसुनजीत फडणवीस, प्राचार्य संजय चाकणे, प्राचार्य सुधाकर जाधवर, बागेश्री मंठाळकर, विद्यार्थी विकास मंडळाचे सदस्य डॉ. सदानंद भोसले उपस्थित होते.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, नैसर्गिक आपत्तीची दाहकता मोठी आहे. या पूरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. शेतीचे, संपत्तीचे, जनावरांसह जीवित हानीही झाली आहे. या स्थितीत त्या ठिकाणच्या लोकांना मदत करण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. या कामाच्या निमित्ताने त्या भागात जाणाऱ्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे आणि तेथील स्थानिकांचे आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळणार आहेत. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सामाजिक भान निर्माण होईल.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या आणि स्वयंसेवी संस्थासह इतरांकडून पैसे आणि वस्तूरुपाने मदतीचा ओघ बाधित क्षेत्राकडे आहे. मात्र त्यांना हाताच्या रुपाने मदतीची आवश्यकता आहे. ती गरज एनएसएसचे विद्यार्थी भागवतील, त्या ठिकाणी स्वच्छतेसह इतर कामे विद्यार्थी करणार आहेत. ही प्रक्रीया पुढच्या सहा महिने चालणार असून विद्यार्थ्यांची विविध पथके मदतीसाठी त्या ठिकाणी जाणार आहेत. या निमित्ताने बाधित क्षेत्रातील लोकांच्या मनाला उभारणी मिळणार असून त्यांना आपत्ती व्यवस्थापनेचे धडे ही मिळतील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय चाकणे यांनी केले. सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले. तर आभार डॉ. सदानंद भोसले यांनी मानले

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments