कोल्हापुर : सांगलीत पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तरीही निम्मी सांगली अजूनही पाण्यात आहे. भाजीपाल्याचे दर कडाडले असून पाणीपुरवठा पूर्णत: बंद असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सांगली आणि कोल्हापुरातील ग्रामिण भागात जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. रोख रकमेअभावीही नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापुरानंतर पाच दिवसानंतर पहिल्यांदाच हरिपूर भागातील काही नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
मात्र कोल्हापुरात सलग सहाव्या दिवशी पावसाचा कहर सुरुच आहे. आत्तापर्यंत अडीच लाखांपेक्षा जास्त पूरग्रस्तांना लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
कोल्हापुरात कालपासून दीड फूट पाणी कमी झाले आहे. मात्र पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे लोकांना संकटांचा सामना करावा लागतो आहे. वीज नाही, घरात पाणी पण प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, कपडे, अन्नधान्य पाण्यात कुजल्याने बाहेरुन येणा-या बिस्कीट आणि पाण्यावर कशीबशी गुजराण होत आहे. पाणीच पाणी चहूकडे अशी स्थिती कायम आहे. अशात एकमेकांना हात देत संकटांचा सामना पूरग्रस्त करत आहेत.
पंचगंगा नदीची पातळी १ ते दीड फूट कमी झाली आहे. तरीही पुराचा धोका कायम आहे. दरम्यान शिरोळ तालुक्यातील आल्यास गावातले नागरिक आजही पुराच्या पाण्यात अडकले आहेत आणि ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या मदतीसाठी नौदलाने पुढकार घेतला आहे. सकाळी सहा वाजताच नौदलाची १४ पथकं या गावातल्या नागरिकांना वाचवण्यासाठी त्या दिशेने रवाना झाली आहेत.
_________________________________________________
_________________________________________________
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. मात्र सांगलीत पावसाचा जोर ओसरला आहे. सांगलीत जिल्हाधिका-यांच्या घराजवळ पाणी साठले होते. ते हळूहळू ओसरु लागले आहे. अजुनही हजारो नागरिक पुरात अडकलेले आहेत. गावभागातही शेकडो नागरिक पाण्याखाली आहेत. त्यांच्यापर्यंत अन्नपदार्थ व पाणी पोहोचवण्यात येत आहे. दुसरीकडे पूरग्रस्त सांगलीकरांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शहरातील नागरिक उत्स्फूर्तपणे मदत करत आहेत. आजुबाजूच्या भागातूनही शक्य ती मदत सांगलीकरांसाठी पाठवली जात आहे. पाण्याच्या बाटल्या, कोरडे खाद्यपदार्थ, चहा, दूधाचे मोफत वाटप केले जात आहे. रिसाला रोड, हिराबाग कॉर्नर परिसरात मदतकार्यासाठी केंद्र उभारण्यात आले आहे.
पाच दिवस पाण्यात अडकलेले वृद्ध, गरोदर महिला व रूग्णांना बाहेर काढण्यास प्राधान्य दिले जात आहे. लष्करी जवान, पोलीस प्रसंगी खांद्यावरून, खुर्चीतून किंवा झोळीतून रूग्ण, ज्येष्ठ नागरिक, बालकांना सुखरूप बाहेर काढत आहेत.
या परिसरातील विविध भागात वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयातर्फे ३८ वैद्यकीय कॅम्प सुरू करण्यात आले आहेत.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments