संपुर्ण महाराष्ट्र व देशात सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातले असुन सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पुणे, उजनी, वीर व भाटघर धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाउस पडत असल्याने या धरणांमधुन निरा व भिमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले होते.परंतु या पाण्यामुळे पंढरपूर येथील अनिल नगर, व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण झोपडपट्टी, लखुबाई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी, भजनदास चौक, जुनी पेठ, गोविंदपुरा, संतपेठ या भागात पाणी आलेले होते. सदर भागातील पुराचे पाणी ओसरल्यानंतर त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
याबाबत उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर यांच्या समवेत बैठक आयोजित करुन पाण्याची परिस्थिती लक्षात घेवुन युद्ध पातळीवर पुरग्रस्त भागात स्वच्छता करावी अशा सुचना उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिलेल्या होत्या. त्यानुसार आज सकाळपासुन पंढरपूर नगरपरिषदेचे १०० स्वच्छता कर्मचारी तसेच मंदिर समितीचे कर्मचारी यांच्यामार्फत सर्वत्र स्वच्छता करण्यात आली असुन ज्या ठिकाणी रोडवर चिखल झालेला आहे तेथील चिखल अग्निशमन वाहनाद्वारे पाण्याने रस्ते धुवुन घेण्यात आलेले आहेत.
_________________________________________________
_________________________________________________
तसेच सर्वत्र ब्लिचिंग पावडर धुरळण्यात आली असुन पंपाद्वारे व दोन मोठ्या टॅक्ट्ररवरील ब्लोअरद्वारे जंतुनाशके व कल्चर फवारण्यात आली आहेत. तसेच फॉगिंगमशीनद्वारे धुर फवारणी करण्यात येत आहे जेणेकरुन कोठेही साथीचा रोग उद्भवणार नाही याची दक्षता नगरपरिषद घेत आहे. त्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ.संग्राम गायकवाड, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर व नगरपरिषदेचे सर्व सफाई कर्मचारी काम करीत आहेत.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________







0 Comments