पंढरपूर- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त बहुजन रयत परिषद व एन.वाय. ग्रुपतर्फे पंढरपूर शहरातील संत पेठेत आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील २५ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून जयंती साजरी केली. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कुठे व्याख्यानमाला, तर कुठे खाऊ वाटप साजरे करून केले जाते, परंतु स्वेरीतील विद्यार्थ्यांनी या निमित्ताने रक्तदान करून जयंती साजरी केली. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील २५ विद्यार्थ्यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करून सहभाग नोंदविला.
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. बी.पी. रोंगे यांच्या हस्ते झालेल्या उदघाटनानंतर स्वेरीच्या स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ समजून रक्तदान केले. त्याठिकाणी पंढरपूर ब्लड बँक, पंढरपूर या रक्तपेढीला पाचारण करण्यात आले होते. यावेळी वाहन चालविताना व वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी प्रत्येक रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश यादव अॅड. बादल यादव, शहराध्यक्ष किशोर खिलारे यांच्यासह स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सहदेव शिंदे, डॉ. रंगनाथ हरिदास व समन्वय प्रा.रोहन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. यावेळी प्रत्येक रक्तदात्याचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, संस्था अंतर्गत असणाऱ्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments