उमेश जी परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डी येथे मोफत नेत्र तपासणी खर्डी प्रतिनिधी युटोपियन शुगर चे संस्थापक चेअरमन उमेश परिचारक यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त खर्डी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हे शिबीर नॅब नेत्र रूग्णालय मिरज व खर्डी ग्रामपंचायत यांच्या वतीने आयोजित केले होते.यावेळी खर्डी आरोग्य केंद्रात वृक्षारोपणही करण्यात आले.यावेळी उपसरपंच प्रणव परिचारक यांनी मनोगत व्यक्त करताना गावातील लोकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन केले व असे उपक्रम दर महिन्यात आयोजित करणार असल्याचे् सांगितले.
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
या कार्यक्रमासाठी सरपंच रमेश हाके उपसरपंच प्रणव परिचारक चेअरमन हनुमंत रोंगे पाटील पं स. सदस्य दादा मोटे सुरेश आगावणे मा. सरपंच भगवान रोंगे मा. चेअरमन उमाकांत रोंगे ग्रा.पं सदस्य सिताराम रोंगे बंडू रणदिवे समाधान लोहार शहाजी कांबळे संतोष कांबळे संभाजी चव्हाण समाधान रोंगे सिताराम चव्हाण नारायण रोगे महादेव लवटे सुधाकर फाळके हरिभाऊ खाताळ बंडू पठाण हुसेन मुलानी भारत नवले मारूती माळी हरी हिलाळ यांच्यासह ग्रामस्थ प्रा.आरोग्य केंद्र खर्डी येथील आरोग्य सेवक डाॅक्टर कर्मचारी व आशा माॅडम मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया मिरज येथे केली जाणार आहे तसेच बिनटाक्याची शस्त्रक्रिया मोफत गॉगल जेवण व राहणे हा खर्च केला जाणार आहे. तसेच शुगर तपासणी ही करण्यात आली या शिबीरसाठी डाॅ.अकीब मुश्रिफ फिल्ड ऑफिसर विश्वास बेंन्द्रेकर डॉ. विलास जाधव यांनी तपासणी केली तर सूत्रसंचालन अर्जुन कांबळे यांनी तर आभार रमेश हाके यांनी केले.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments